गौतमी पाटीलच्या कार्यक्रम बंदोबस्तासाठी चक्क पाच लाखांचा खर्च

0

सेालापूर , 21 मे  राष्ट्रीय समाज पक्षाचे सरचिटणीस सोमा मोटे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त तरुणाईमध्ये सध्या प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या गौतमी पाटीलच्या गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. गौतमी पाटलाच्या अगोदर झालेल्या कार्यक्रमातील तरुणाईच्या राड्यामुळे या पठ्ठ्याने चक्क १०६ पोलिस बंदोबस्तासाठी सुमारे पाच लाख रुपयांचा खर्च केला; परंतु कार्यक्रम व्यवस्थितच केला.या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाबरोबर त्यांनी बंदोबस्तासाठी केलेला खर्चही मोठ्या चर्चेत आला आहे.

सांगोला तालुक्यातील घेरडी येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे सरचिटणीस सोमा मोटे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे नियोजन जरी करण्यात आले असले तरी आयोजकांना गर्दीवर नियंत्रण करून कार्यक्रम यशस्वी होईल याची खात्री नव्हती. या अगोदर गौतमीच्या अनेक कार्यक्रमांमध्ये तरुणांच्या उत्साहाला उधाण आल्याने अनेक ठिकाणी राडा झाला होता.