पंतप्रधानांचे विचार साकार करा – बावनकुळे

0

नाशिक, 21 मे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 वर्षात भारताला जगाच्या पाठीवरती बळकट केले आहे त्यामुळे आता पंतप्रधानांचे विचार प्रत्यक्षात देशामध्ये आणणारे प्रकल्प साकार करून समाज बळकटी करण्याचे कार्य करावे असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांच्या प्रयत्नातून महानगरपालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या दुसऱ्या मजल्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे, आ. राहुल ढिकले, कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, लता पाटील, अमोल पाटील, माजी स्थायी सभापती गणेश गीते, देवदत्त जोशी लक्ष्मण सावजी, आदींसह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बावनकुळे यांनी सांगितले की, आरोग्य व शिक्षणाच्या माध्यमातून देशाला विकासाच्या दिशेने नेण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार प्रत्यक्षात आणण्याचे काम या प्रकल्पातून केला आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले आहे. या वास्तूच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीला सक्षम, बळकट करण्याचे काम हे निश्चितच वेगळ्या उंचीचे असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की राज्यामध्ये नवीन शिक्षण येती सुरू होत असल्याचा सुचवाच करून मातृभाषेतून पदवी देण्याचा निर्णय देखील सरकारने घेतला आहे असे त्यांनी सांगितले.