विदर्भातील चंद्रपुरात सोन्याचा साठा

0

मुख्यमंत्र्यांनीच दिली माहिती


चंद्रपूर. निसर्गाने विदर्भाला भरभरून दिले आहे. इथल्या जमिनीत कोळशापासून ते मँगनीजपर्यंत मोठी खनिजसंपत्ती आढळते (coal manganese mines). मात्र आता याच जमिनीत सोन्याचा साठाही दडल्याचा दावा (Gold Mines) केला जातोय. भुवैज्ञानिक सर्वेक्षण ऑफ इंडियाने (GSI) विदर्भाच्या जमिनीत काय दडले आहे, याचा शोध लावला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मिंझरी आणि बामणी या भागात भूर्गभात सोन्याचे दोन ब्लॉक आढळून आहेत. या खानी वन्यजीव क्षेत्रात असल्याने येथून सोने काढले जाणार का या बाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. या वृत्ताला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दुजोरा दिला आहे. केंद्र सरकारच्या खनिकर्म विभागाचा अहवाल राज्याच्या खनिकर्म विभागाला मिळाला आहे. विदर्भयासोबतच कोकणातीलत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही भूगर्भात सोने असल्याची शक्यता आहे. खनिकर्म विभागाने चाचणी सुरू केली आहे. या बाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील ताज हॉटेलमधील खाण क्षेत्रातील संधी या गुंतवणूकदारांच्या परिषदेत केला होता. तयानुसार राज्यात खनिकर्म संशोधन संस्था सुरू करून या व्यवसायातील अडचणी दूर करून राज्याच्या महसुलासह रोजगारात वाढ झाली पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.


या कार्यक्रमात बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात सोन्याचे दोन ब्लॉक असल्याची माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. आमच्या काळात हे सोने निघाले तर ती राज्यासाठी खूप मोठी उपलब्धी असेल. राज्यात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव असून गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्प सुरू करू शकतो, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.


गावकऱ्यांना मोठी आस


जीएसआयच्या संशोधकांनी दिलेल्या अहवालात पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गडचिरोलीच्या भूगर्भात सोन्याचा साठा आढळून आलाय. त्यानुसार 1984-85 मध्ये नागपूर जिल्ह्यातल्या भिवापूरमधील पुल्लर, परसोरी, थूतानबोरी आणि गडचिरोलीत सर्वेक्षणही करण्यात आले. इथल्या घनदाट जंगलात सोन्याचा साठा असल्याचं सांगण्यात येत आहे. आता सोन्याच्या आशेने इथले गावकरी आस लावून बसलेत. कधीतरी आपले नशीब फळफळेल या अपेक्षेने त्यांनी आपली जमीन विकण्याचा विचारही केलेला नाही. अर्थात हे सोने शोधण्यासाठी सरकारी स्तरावर पुरेसे प्रयत्न होत नाहीत अशीही स्थानिकांची तक्रार आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा