नागपूर, (nagpur)7 एप्रिल 2023 निखिल भारत बंग साहित्य संमेलनच्या नागपूर शाखेच्या (Golden Jubilee Year)सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ९ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता सारस्वत सभा वाचनालय, धंतोली येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (NBBSS)एनबीबीएसएस अखिल भारतीय अध्यक्ष सपन गांगुली व सचिव अनिल धर तसेच, विविध शाखांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांगीतिक सादरीकरण – ‘न हन्यते अमृता’, ‘त्रिगुण’ (‘Na Hanyate Amrita’, ‘Triguna’)या महाभारतावर आधारित नृत्यनाटिका सादर केल्या जातील. या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन(Nikhil Bharat Bang Literary Conference) निखिल भारत बंग साहित्य संमेलनच्या सचिव श्रीमती लाबोनी नियोगी यांनी केले आहे.