नागपूर.(nagpur) मिहान सेझ (Meehan Sez) अंतर्गत असणाऱ्या कंपन्या निर्यात क्षेत्रात चमकदार कामगिरी (Brilliant performance in export sector ) करीत आहेत. पहिल्यांदाच मिहानच्या निर्यातीने एका वर्षात 3,000 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. मिहानमधून आतापर्यंत 12,906 कोटींची निर्यात झाली आहे. तर व्यापारी मालाची निर्यात 3 टक्क्यांनी घटली आहे. गेल्यावर्षी 1,219.64 कोटी रुपयांची व्यापारी निर्यात झाली होती, जी यावर्षी किरकोळ घटून 1187.81 कोटी रुपयांवर आली आहे. सेवा क्षेत्राने उल्लेखनीय वाढ नोंदवली आहे. गेल्यावर्षी सेवा क्षेत्राने 2,809 कोटी रुपयांची निर्यात केली होती, जी यावेळी 2,000 कोटी ओलांडून 2,096.88 कोटींवर पोहोचली आहे. यामध्ये 32 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. याचा अर्थ सॉफ्टवेअर कंपन्या (software companies ) आता पूर्वीपेक्षा खूप चांगले काम करत आहेत. त्यामुळेच रोजगाराच्या आकडेवारीतही सुधारणा होत आहे. या आर्थिक वर्षात इन्फोसिसचाही समावेश होऊ शकतो. यानंतर व्यवसायात आणखी वाढ होईल. ही कंपनी मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करणारी आहे. सध्या मिहान सेजमध्ये सेवा क्षेत्रातील 25 युनिट्स आणि मर्चेंडाईज क्षेत्रातील 12 युनिट्स निर्यात व्यवसाय करत आहेत.
6 वर्षात 6,943 कोटी सॉफ्टवेअर निर्यात
गेल्या 6 वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास (Software areas)सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपन्यांनी 6,943 कोटी रुपयांची निर्यात केली आहे. विकास दरवर्षाला सुमारे 25-35 टक्के राहिला आहे. या कंपन्या अनेक देशांसाठी काम करत आहेत. जलद भरती आणि विस्तारही होत आहे. गेल्या काही वर्षांत छोट्या कंपन्यांचे योगदानही वाढले आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात मिहान सेजमधून 1,588 कोटी रुपयांचे सॉफ्टवेअर निर्यात करण्यात आले, तर 20-23 मध्ये 2,000 कोटींचा आकडा ओलांडून 2,096 कोटींवर पोहोचला. 2015-16 मध्ये येथून केवळ 134 कोटी रुपयांची निर्यात झाली.
उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कंपन्या
मिहान सेजमध्ये देशातील प्रसिद्ध ब्रँड्स इंन्फोसिस, टीसीएस, एचसीएल, ल्यूपीन, टेक महिंद्रा सारख्या मोठ्या कंपन्या आहेत. त्याचप्रमाणे आता रिलायन्स एयरोस्पेसमध्येही थॅलेस, दशॉ रिलायन्स, पतंजली सारख्या कंपन्यांचेही उल्लेखनीय प्रदर्शन सुरू आहे. यात स्थानिक कंपनी इंफोसेप्टसुद्धा यशस्वी वाटचाल करीत मिहानची उलाढाला वाढविण्यात मदत करीत आहे. टाटा एडवान्स सिस्टम लि., ग्लोबल लॉजिकसुद्धा आपले योगदान देत आहे. यातील अनेक कंपन्यांची उलाढाल 600-700 कोटींच्या पुढे गेली आहे.