भरधाव कारच्या धडकेत तिघे ठार 3 गंभीर जखमी

0

नागपूर. गावी परतत असताना मालवाहू बोलेरो (Cargo Bolero ) भररस्त्यात बंद पडली. परिसरात काळाकुट्ट अंधार असल्याने रस्त्याच्या कडेला नासुरुस्त वाहन उभे करून मोपेडच्या उजेडात वाहन दुरुस्तीची धडपड सुरू होती. त्याचवेळी भरधाव कार आली. वाहन दुरुस्तीत व्यस्त असताना साऱ्यांनाच एकाचवेळी घडक दिली. या घटनेत तिघांचा घटनास्थळीच मृत्यू (Three killed in car accident) झाला. तर या घटनेत तिघे गंभीर जखमी (Three seriously injured ) आहेत. तिन्ही जखमींना तातडीने मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजणक आहे. गुरुवारी रात्री नागपूर – वर्धा मार्गावर नागपूर जिल्ह्यातील बोथली शिवारात ही भीषण घटना घडली. मृतांमध्ये दोन सख्क्या भावांचा समावेश आहे. कर्त्या भावांच्या एकाचवेळी मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिसरा मृतकही त्यांच्याच गावातील रहिवासी असून घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

मनोहर लिडबे व महादेव मनोहर लिडबे या दोन सख्ख्या भावंडासह उज्वल सुनिल गव्हाळे याचा मृत्यू झाला. तिघेही कान्होलीबारा येथील रहिवासी होती. कान्होलीबारा येथील तिघेही मालवाहू बोलेरो वाहनातून हरभर्या्ची पोती घेऊन नागपूरच्या दिशेने जात होते. दरम्यान, त्यांचे मालवाहू वाहन वर्धा- नागपूर रस्त्यावरील बोथली शिवारात नादुरुस्त झाले. यावेळी परिचयातील तिघे मागून अॅरक्टिवाने सोबत चलत होते. वाहन बंद झाल्याने मोपेडस्वारही थांबले. मोपेडचा लाईट लावून उजेडात रस्त्यावरच वाहन दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. त्याचवेळी एमएच ४९ बीआर ५९५९ क्रमांकाच्या भरधाव कारने आधी अॅतक्टिवाला व नंतर त्यांच्या वाहनाला जोरात धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की यात अॅ क्टिवा चेंडूसारखी हवेत उडाली. या अपघातात तिघांनाही गंभीर स्वरूपाचा मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. इकडे घटनेची माहिती गावात पोहोचली. अनेकांनी घटनास्थळी तर काहींनी रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली. गवात हनुमान जयंतीच्या कार्यक्रमामुळे आनंदाचे वातावरण होते. या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली. याप्रकरणी बुट्टीबोरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

 

 

चिकन साते विथ पीनट सॉस आणि मोतीचुर रबडी पर्फेत|Chicken Satay With PeanutSauce|Motichur Rabdi parphet