Home LOCAL NEWS सरकार ओबीसी समाजाच्या पाठीशी आहे – डॉ आशिष देशमुख

सरकार ओबीसी समाजाच्या पाठीशी आहे – डॉ आशिष देशमुख

0

 

नागपूर – नागपूर जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय पुस्तिकेवर पाच वर्षाची शिक्षा सुनावलेल्या सुनील केदार यांचा फोटो होता. त्या फोटोची होळी भाजपच्या नगरसेवकांनी केल्याने रागावलेल्या सुनील केदार यांच्या सांगण्यावरून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल जिल्हा परिषद परिसरात लागलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळे फासले ही निंदनीय घटना असल्याने उद्या जिल्हा परिषदेसमोर भाजपाकडून या घटनेचा निषेध म्हणूण मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजप नेते,माजी आमदार डॉ आशिष देशमुख यांनी दिली.

छगन भुजबळ राजीनामा संदर्भात माध्यमांशी बोलताना देशमुख म्हणाले,राज्यातील सगळ्या प्रमुख नेत्यांची एकच भूमिका आहे की, ओबीसी समाज आरक्षणाला कुठेही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, आणि छगन भुजबळ देखील याच मताचे आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की, त्यांनी अडीच महिन्यापूर्वी दिलेला राजीनामा तो आज पर्यंत मंजूर झाला नसेल तर समोरही होणारं नाही, कारणं सरकार ओबीसी समाजाच्या पाठीशी असून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.

 

बिहारी स्टाइल धमाकेदार चिकन | Shankhnaad News #shankhnaadnews #live