गोंदियात ‘गाव चलो अभियान’ बाहेरचा उमेदवार नकोच-खा सुनील मेंढे

0

 

गोंदियाभारतीय जनता पार्टीतर्फे 4 ते 11 फेब्रुवारी या काळात व्यापक जनसंपर्कासाठी ‘गाव चलो अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील सर्व केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तम संघटनात्मक बांधणी करत, विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून भाजपा कार्य करत आहे. तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारचे मागच्या 10 वर्षातील कार्य, जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्ती, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी ही सर्व माहिती पोहोचण्याच्या उद्देशाने ‘गाव चलो अभियान’ हाती घेण्यात आले आहे.

मोदीजींची गॅरंटी काय आहे? हे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी मागच्या 10 वर्षातील मोदी सरकारच्या योजना व उल्लेखनीय कामगिरीची माहिती देणारी पत्रके वितरित करण्यात येणार आहेत.शहरी भागात वॉर्ड निहाय हे अभियान राबविले जाईल. या अंतर्गत राज्यात 50 हजार युनिट्समध्ये भाजपाचे 50 हजार प्रवासी नेते, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणार आहेत. पक्षाचे आजी व माजी खासदार, आमदार, जि.प सदस्य यांच्यासोबतच सर्व नेतेमंडळी जिल्ह्यातील प्रत्येक युनिटमध्ये प्रवास करतील व त्यांना सुपर वॉरियर्सचे देखील सहकार्य मिळेल, प्रत्येक युनिटमध्ये भाजपाचा प्रवासी नेता एक दिवस मुक्काम करून, बुथ प्रमुखांच्या बैठका, नागरिकांच्या भेटी, नवमतदारांशी चर्चा अशी आखून दिलेली 18 संघटनात्मक कामे करेल, असेही. खा. सुनील मेंढे यांनी सांगितले.

गोंदिया- भंडारा लोकसभेमध्ये जिल्हाबाहेरचा उमेदवार हा पराभूत होतो, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे गोंदिया आणि भंडारा लोकसभेसाठी बाहेरचा उमेदवार सामान्य नागरिकांना चालत नाही. त्यामुळे जिल्ह्यातलाच उमेदवार राहील असे म्हणत खासदार यांनी आपल्याच पक्षाचे नागपूर येथील गोंदिया भंडारा विधानसभेचे माजी विधान परिषद सदस्य आणि पालकमंत्री परिणय फुके यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. सध्या परिणय फुके हे लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असून, संपूर्ण गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भेटीगाठी आणि कार्यक्रमाचे नियोजन करीत आहेत. त्यामुळे हा टोला त्यांना लगावला असावा अशी चर्चा आहे.

 

नाश्त्यात झटपट बनवा बाजरीची लापशी | Shankhnaad News #shankhnaadnews #live