Home LOCAL NEWS खासदार भजन स्पर्धेची महाअंतिम फेरी आज

खासदार भजन स्पर्धेची महाअंतिम फेरी आज

0

केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यंच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा

पद्मश्री श्री. जनार्दनपंत बोथे यांची विशेष उपस्थिती राहणार

नागपूर(Nagpur): केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित खासदार भजन स्पर्धेची महाअंतिम फेरी उद्या, शनिवार, दि. २१ फेब्रुवारीला दुपारी १ ते सायं. ५ या वेळेत शिक्षक सहकारी बँक सभागृह, गांधीसागर महाल येथे होणार आहे. महाअंतिम फेरीनंतर संध्या ५.३० वाजता बक्षीस वितरण सोहळा होणार असून ना. श्री. नितीन गडकरी तसेच श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरीचे पद्मश्री श्री. जनार्दनपंत बोथे गुरुजी यांच्या हस्ते भजन स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे.

यावेळी श्री. जनार्दनपंत बोथे गुरुजी यांना पद्मश्री जाहीर झाल्याबद्दल खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे त्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, महापौर सौ. नीता ठाकरे, उपमहापौर सौ. लीला हाथीबेड, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके, आमदार संदीप जोशी, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष राजेश बागडी, गौरीशंकर पाराशर, बाळासाहेब कुळकर्णी, दीपक खिरवडकर, अविनाश घुशे, नितीन तेलगोटे, भोलानाथ सहारे, सौ. मनीषा काशीकर आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहतील.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्य आयोजित खासदार भजन स्पर्धेत यंदा नागपुरातील ७५४ भजनी मंडळांनी उत्साहात सहभाग नोंदवला असून विठ्ठल भक्तीचा जागर केला. या भजन स्पर्धेत ज्येष्ठ वयोगटातून १४ तर युवा वयोगटातून ७ असे एकूण २१ रोख पुरस्कार व सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील. आपण या स्पर्धेला उपस्थित राहून भजनी मंडळाचा उत्साह वाढवावा असे आवाहन डॉ.श्रीरंग वराडपांडे यांनी केले आहे.