नागपूर : मंत्र्याकडे कोणतेही खाते असले तरी त्यांची तळमळ, समर्पणभाव आणि काम करण्याची जिद्द यातून त्या खात्याची ओळख होत असते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुधीर मुनगंटीवार यांनी वन खात्याची धुरा सांभाळली. त्यांनी केलेल्या कार्यामुळेच महाराष्ट्राच्या वनखात्याला देशपातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर नावलौकिक मिळाले, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. निमित्त होते नागपूर येथे वन भवनाच्या लोकार्पण सोहळ्याचे.
कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, मुख्य वनबल प्रमुख वाय.एल.पी.राव, आमदार आशिष जयस्वाल, आमदार देवराव होळी, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकुद्दे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.