
नागपूर (Nagpur) : ५९ वर्षांची अतूट परंपरा असलेले जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांनी भव्य दागिने प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. हे प्रदर्शन नागपूर येथील हॉटेल सेंटर पॉईंट, रामदासपेठ येथे दिनांक ७ ते १० फेब्रुवारी २०२५ या कालावधीत भरविण्यात आले आहे.
आज शुक्रवारी या भव्य दागिने प्रदर्शनाचे उद्घाटन माजी नगरसेविका परिणीता फुके आणि निर्मल अर्बन बँकेच्या अध्यक्ष पुजा मानमोडे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी प्रमुख अतिथींनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला आणि महिलांसाठी दागिन्यांच्या महत्त्वावर आपले विचार मांडले.
प्रदर्शनाचे उद्घाटन करताना माजी नगरसेविका परिणीता फुके म्हणाल्या, “दागिने हे प्रत्येक महिलेच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. मात्र, दागिने निवडताना त्यांच्या शुद्धतेची व गुणवत्तेची खात्री करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.” तसेच, केवळ महिलाच नव्हे तर पुरुषांनीही या भव्य प्रदर्शनाला भेट द्यावी आणि आपल्या परिवारासाठी उत्कृष्ट दागिने खरेदी करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
पूजा मानमोडे यांनी पेडणेकर ज्वेलर्स यांच्या या दीर्घकालीन परंपरेचे कौतुक करताना सांगितले, “५९ वर्षांपासून पेडणेकर ज्वेलर्स आपल्या ग्राहकांचा विश्वास संपादन करत आले आहे. ही प्रदर्शनदेखील त्याच विश्वासाचे द्योतक आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन उत्कृष्ट दागिन्यांची खरेदी करावी आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.,असे आवाहन केले.
या प्रदर्शनात पारंपरिक आणि नवनवीन दागिन्यांचा विशेष संग्रह ठेवण्यात आला आहे. सोने, हिरे, चांदी तसेच आधुनिक ट्रेंडनुसार खास आभूषणांचे अनोखे नमुने येथे उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, प्रत्येक खरेदीवर आकर्षक भेटवस्तू देण्यात येत आहे.
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी नागपूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रदर्शनाचा लाभ घेण्यासाठी नागपूरकरांनी ७ ते १० फेब्रुवारी दरम्यान हॉटेल सेंटर पॉईंट, रामदासपेठ येथे आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन प्रदर्शन प्रमुख सागर हळदणकर यांनी केले आहे.