Home Breaking news राष्ट्रीय एकात्मता दौड जनजागृती करीता भव्य तिरंगा बाईक रॅली आज

राष्ट्रीय एकात्मता दौड जनजागृती करीता भव्य तिरंगा बाईक रॅली आज

0

जटपूरा गेट ते गांधी चौक व गांधी चौक ते जटपूरा गेट

०१ फेब्रुवारी २०२६ रोज रविवारला सकाळी ठीक ८:०० वाजता

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरातील सर्व शैक्षणिक संस्था व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २ फेब्रुवारी २०२६ रोज सोमवार ला स्थानिक गांधी चौक ते जटपूरा गेट पर्यंत सकाळी ठीक ८:०० वाजता भव्य “राष्ट्रीय एकात्मता दौड” (Run for Unity) चे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय एकात्मता दौडच्या जनजागृती करीता आज (दि.०१) ला स्थानिक जटपूरा गेट ते गांधी चौक व गांधी चौक ते परत जटपूरा गेट पर्यंत भव्य तिरंगा बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले आहे.

या तिरंगा बाईक रॅली मधे चंद्रपूरकर स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन जागृती करणार आहेत.चंद्रपूर महानगरात होणाऱ्या या राष्ट्रीय एकात्मता व स्वातंत्र्य चेतना महोत्सवात चंद्रपुरकर सक्रियरित्यां सहभागी होतीलच परंतु तिरंगा बाईक रॅली मधेही चंद्रपूरकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरातील सर्व शैक्षणिक संस्था, महाविद्यालय व प्राचार्यांनी केले आहे.