
नागपूर ( Nagpur ) 31/01/2026 :- दि धरमपेठ महिला मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक सन 2025 ते 2030 या कालावधी करता निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा अधिकारी नागपूर मा. डॉ. श्री. डॉक्टर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री प्रवीण महिरे व सह अधिकारी यांनी निवड प्रक्रियेनंतर सर्व नवनियुक्त संचालिका सौ नीलिमा बावणे, सारिका पेंडसे, अनघा मुळे, अनघा वैद्य, वृंदा शेंडे, नीलम बोवाडे, श्रद्धा पुरोहित, स्मिता गोल्हार, साधना रक्षमवार, डॉक्टर प्रीती उमाठे, वैशाली झाडे, अरुणा पुरोहित, छाया शुक्ला, स्मिता मैद व डॉक्टर शिल्पा टावरी नावे जाहीर केलेत व संचालकांचे अभिनंदन व सत्कार केला

तसेच दि. 21/01/2026 रोजी निवडणुक निर्णय अधिकारी मा. श्री. विपीन इंटनकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरीक्त जिल्हा निवडनुक निर्णय अधिकारी श्री. प्रविण महिरे यांच्या उपस्थितीत संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांसाठी निवड प्रक्रिया पार पडली. दि. 29/01/2026 रोजी सेंट्रल निवडणुक अधिकारी (CEA, New Delhi) तर्फे निवडणुक निर्णय अधिकारी मा. डॉ. श्री. विपीन ईटनकर व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी यांनी अध्यक्षस्थानी सौ. सारिका संजय पेंडसे ड उपाध्यक्षस्थानी सौ. अनधा विवेक वैद्य यांची एकमताने अविरोध निवडून आल्याची घोषणा केली. संस्थेच्या नवनियुक्त अध्यक्ष सौ. सारिका संजय पेडसे व उपाध्यक्ष सौ. अनधा विवेक वैद्य यांचा सत्कार मुख्य कार्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सहा. मुख्य व्यवस्थापकव सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.















