उष्माघाताची लक्षणे कशी ओळखाल?

0

नागपूर(NAGPUR)जिल्ह्यात तापमानाचा पारा 42 अंशावर पोहोचला आहे. त्यामुळे उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने जिल्हयातील सर्व शासकीय आरोग्य संस्थमधे उष्माघात कक्ष सुरु केलेले आहेत. आरोग्य संस्थामधे रुग्णांसाठी कुलर, थंड पाण्याची व्यवस्था, फॅन यासह औषधोपचारासाठी आवश्यक सामग्री उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. वाढत्या उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या आजारासह होणाऱ्या दुष्परिणामाविषयी जनजागृती करण्यात येत माहे. उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरीत नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात येत आहे.

 उष्माघात होण्याची कारणे(Causes of heat stroke) उन्हात शारीरीक श्रमाची, अंग मेहनतीचे व कष्टाची काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संपर्क आल्याने उष्माघात होऊ शकतो.

 उष्माघाताची लक्षणे(Symptoms of heatstroke):- मळमळ, उलटी, हात पायांना गोळे येणे, थकवा येणे, जास्त ताप येणे, त्वचा गरम होणे, व कोरडी पडणे, क्वचित लाल होणे, घाम न येणे, डिहायड्रेशन, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे, बेशुध्दआवस्था आदी अति जोखमीच्या व्यक्ती, बालके, लहान मुले, खेळाडु, सतत उन्हात काम करणाऱ्या व्यक्ती, वयस्कर व्यक्ती ज्यांना ह्दयरोग, फुफुसाचे विकार, मुत्रपिडांचे विकार इत्यादी.

 प्रतिबंधात्मक उपाययोजना(Preventive measures):- 

  1. वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची काम करणे टाळणे, कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा सायंकाळी कमी तापमानात करण्याचे नियोजन करावे 2. उष्णता शोषुण घेणारे कपडे (काळया किंवा भडक रंगाचे) वापरु नयेत. सैल पांढरे कपडे किंवा फिक्कट रंगाचे सुती कपडे वापरावेत. तीव्र उष्णाच्या वेळेस बाहेर जाणे टाळावे. ३. प्रवासाला जातांना पाणी सोबत न्यावे, डिहायड्रेशन होऊ देऊ नये, लिंबु सरबत लस्सी ताक, नारळ पाणी आदी प्यावे. उन्हात बाहेर जातांना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, रुमाल, फेटा, छत्री, आदीचा वापर करावा. 4. घरामध्ये कामाच्या ठिकाणी कुलर्स एअर कंडीशनर्सचा आवश्यकतेनुसार वापर करावा.

आवश्यक प्रथोमोपचार(Necessary first aid):-

प्रथम सावलीत आणावे, रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी त्वरित उपचार सुरु करावेत, कपडे सैल करुन त्वरित अंग थंड पाण्याने शरीराचे तापमान कमी होईपर्यंत पुसत राहावे. हवेशीर व थंड खोलीत ठेवावे, खोलीतील पंखे, कुलर्स, एअर कंडिशनर्स त्वरित चालू करावेत.

रुग्ण शुध्दीवर आल्यास त्यास थंड पाणी, जल संजीवनी दयावे व डिहायड्रेशन टाळावे. चहा, कॉफी देऊ नये. काखेखाली आइस पॅक ठेवावेत, रुग्णांच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्या ठेवाव्यात. शरीराचे तापमान 36.8 होईपर्यंत सदरील प्रथमोपचार सुरु ठेवावेत. रुग्णांस रुग्णालयात नेण्याची आवश्यकता वाटल्यास तत्काळ मदतीसाठी 108 या क्रमांकावर संपर्क केल्यास निःशुल्क रुग्णवाहीका उपलब्ध होईल. ती बोलावून अथवा उपलब्ध वाहनांची मदत घेऊन तत्काळ आरोग्य संस्थेत रुग्णास घेऊन यावे. या ठिकाणी गरजेनुसार पुढील उपचार करण्यात येतील, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी केले आहे.