धुळे आगारातून पहिली अयोध्या बस किती आहे भाडे ?

0

(Dhule)धुळे – अयोध्या येथे राम लल्लाच्या दर्शनासाठी संपूर्ण जगभरातून भाविक विविध मार्गाने जात आहेत. मात्र, धुळे परिवहन महामंडळाने पहिल्यांदाच धुळे ते अयोध्या बस सुरू केली आहे. या बसला भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पहायला मिळाले. 22 जानेवारीला अयोध्येत राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर संपूर्ण जगभरातून भाविकांची अयोध्येच्या दिशेने गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. मिळेल त्या वाहनाने भाविक अयोध्या येथे जात असून लाखो भाविक दररोज अयोध्येत दर्शन घेत आहेत. सध्या एक बस सुरु करण्यात आली असून प्रतिसाद पाहून बसची संख्या वाढवली जाईल असे विभाग नियंत्रक विजय गीते यांनी नमूद केले.

या सेवेसाठी ४ हजार ५४५ रुपये शुल्क आकारले जात आहेत. धुळ्याहून अयोध्येत पोहचून प्रवाशी दर्शन घेऊन परतीच्या प्रवासात बस वाराणसीला जाईल. वाराणसी येथे प्रयागराजला मुक्कामी असेल, त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी धुळ्याकडे बस प्रस्थान करेल. या प्रवासादरम्यान दोन चालक बस सोबत असतील. तब्बल वीस तासांचा आणि तब्बल सोळाशे किलोमीटरचा प्रवास ही बस करणार आहे.