हम साथ साथ है इसलिये डरना मना है :

0

 

मित्रांनो, खरोखरी देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis )एक वेगळेच रसायन आहे. बघा ते कोणतेही कुठलेही राजकीय भाकिते करून वेळ घालवितांना फाल्तुक बडबड करतांना तुम्हाला दिसणार नाहीत म्हणजे त्यांनी कधी स्वतःचा संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे करवून घेतला, कधीच असे घडत नाही. त्यांना इतर सर्व धर्माच्या लोकांना अगदी मनापासून मदत सहकार्य सतत करायला आवडते ते कधीही कोणत्याही अगदी खाजगीत सुद्धा टीका करतांना तुम्हाला दिसणार नाहीत किंवा कोणालाही ते कमी लेखत नाहीत, ते कायम शांत असतात, अस्वथ काळात प्रसंगात ते आत्मचिंतन करण्यात मग्न असतात. मीडिया त्यांना कायम दुय्यम वागणुक देते त्यांच्या मोठ्या मनाच्या वृत्तीचा मीडियातले अनेक गैरफायदा घेतांना मी स्वतः बघितले आहेत पण फडणवीस त्याकडे दुर्लक्ष करतात, त्यांच्या मनात बदल्याची भावना नसते याचा अर्थ ते घाबरट आहेत भितात गांडू आहेत असा अजिबात नाही कारण जेव्हा केव्हा अमुक एखादा चुकीचे काम करतो, मग तो कोणीही असो पराक्रमी फडणवीस त्याला वठणीवर आणून सोडतात. ते आपणहून उगाच डावपेच खेळण्यात वेळ घालवीत नाहीत, सतत ते सकारात्मक वागतात आणि बोलतात पण एखादा खेटला कि खेटणाऱ्याचा ते असा काही गेम करतात कि त्याला आयुष्यभर ती बोचणी पुरेशी ठरते…

च्यायला ! आमची अख्खी हयात राजकारणावर लिहिण्यात गेली पण आज जरा वेगळ्या विषयाला हात घालायचा आहे कारण भेडसावणारा प्रश्न सर्वसामान्यांचा आहे. महत्वाचे लक्षात घ्या, समजा तुम्ही किंवा तुमच्या आसपासचा जर एखादा गंभीर रुग्ण त्याचे कुटुंब निर्धन थोडक्यात दारिद्र्य रेषेच्या खाली आर्थिकदृष्ट्या तुमचे उत्पन्न असेल तर जे नेमके तुम्हाला मला माहित नव्हते ते मी येथे उलगडून सांगणार आहे. न्यायालयाच्या आदेशा नुसार निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांवर मोफत व सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार करणे त्या त्या इस्पितळांना बंधनकारक आहे. केवळ आपल्या राज्यात विविध खाजगी महागड्या इस्पितळातून सुमारे बारा हजार बेड्स निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांकरिता उपलब्ध आहे, मला नाही वाटत हे सर्वसामान्यांना ठाऊक आहे किंवा असते, जाणूनबुजून अशा महागड्या इस्पितळातले बेड्स व उपचार निर्धन व दुर्बल वर्गाऐवजी इतरांना दिले जातात त्यांच्या कडून नेहमीप्रमाणे मोठी लूटमार केली जाते. मुंबई पुण्यातील मग ते रिलायन्स ग्रुपची इस्पितळे असतील, मंगेशकर इस्पितळ असेल, बॉम्बे किंवा जसलोक असेल पुण्याचे सह्याद्री असेल, थोडक्यात नागपूर पुणे मुंबई ठाणे किंवा संभाजीनगर अशा प्रत्येक महानगरातून या पद्धतीची जी महागडी नामांकित न परवडणारी इस्पितळे आहेत तेथे हमखास दर दिवशी निर्धन व दुर्बल घटकांसाठी हे असे मोफत बेड्स आणि उपचार नक्की उप्लब्ध आहेत असतात ज्याचा क्वचित गरिबांना फायदा होतो, हि इस्पितळे अशी माहिती मुद्दाम गरिबांपासून लपवून ठेवतात त्यांना हाकलून लावतात, हे जेव्हा मुख्यमंत्री असतांना थेट देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात आले त्यानंतर त्यांनी जातीने यात लक्ष घातले विशेष म्हणजे मुख्यमंत्री सहाय्यता निधी या रुग्णांना आर्थिक किंवा सर्वोतपरी सहाय्य करणाऱ्या विभागात जातीने लक्ष घातले तेव्हापासून आजतागायत राज्यातल्या निर्धन व दुर्बल रुग्णांना ज्यापद्धतीने सहकार्य व जीवनदान मिळाले त्यावर एक कादंबरी मला नक्की लिहिता येईल…

पुढे जे मी सांगणार आहे ते तर तुम्हाला नक्की एकाचवेळी पाचही बोटे तोंडात घालायला भाग पाडणार आहे. वास्तविक उपमुख्यमंत्री या नात्याने फडणवीसांनी तदनंतर रुग्ण सेवेत वेळ खर्ची घालण्याची तशी फारशी गरज नव्हती पण येथेही ते थांबले नाहीत त्यांचे मन त्यांना अस्वस्थ बसू देत नव्हते त्यातून महाराष्ट्राच्या इतिहासात वेगळे काहीतरी पहिल्यांदा घडले, फडणवीसांनी चक्क स्वतःच्या अधिकारात देखील रुग्णांचा सहाय्यता निधी आणि मदत विभाग सुरु केला ज्याचे प्रमुख वैद्यकीय सहाय्यता क्षेत्रातले प्रचंड अनुभवी रामेश्वर नाईक यांची नेमणूक करण्यात आली. माझे पुढले वाक्य सर्वाधिक महत्वाचे आहे ते टिपून व जपून ठेवा. समजा तुम्ही किंवा तुमच्या आसपासचा एखादा गंभीर रुग्ण ज्यांना महागड्या इस्पितळातून उपचार करवून घ्यायचे आहेत आणि इस्पितळातून टाळाटाळ जर केल्या जात असेल तर तातडीने थेट रामेश्वर नाईक यांना त्यांच्या व्हाट्सअप वर मेसेज करा, पुढल्या काही क्षणात तुमच्याशी ते किंवा त्यांचे कर्मचारी नक्की संपर्क साधून नेमक्या रुग्णाला नक्की न्याय मिळेल. श्री रामेश्वर नाईक यांचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे 9322455955. केवळ मेसेज करावा थेट संपर्क साधू नये फोन करू नये. महत्वाचे म्हणजे राज्यातली सारी महागडी रुग्णालये धर्मादाय स्वरूपाची असल्याने त्यांना शासनाच्या अनेक सवलतींचा फायदा होत असतो तथापि, निर्धन व दुर्बल घटकातल्या लोकांना देखील सोडायचे नाही, दुर्लक्षित करायचे, हे अतीच झाले म्हणून फडणवीसांनी लक्ष घातले आणि या पद्धतीच्या रुग्णालयांना बऱ्यापैकी ताळ्यावर आणले वठणीवर आणले, विशेष म्हणजे तसे हे कटकटीचे काम पण फडणवीसांनी आपणहून मुद्दाम हा विभाग मंत्रालयातील आपल्या कार्यालयात त्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. ज्या रुग्णाचे किंवा त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 80 हजारापर्यंत आहे अशांवर मोफत उपचार केले जातात आणि ज्यांचे उत्पन्न 3 लाख 60 हजारापर्यंत आहे त्यांच्या वर पन्नास टक्के सवलतीच्या दरात उपचार केले जातात, गरिबांना सहकार्य करण्याची तुमची भूमिका असावी म्हणूनन्हे खास तुमच्या माहितीसाठी….

तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी