राम भक्त म्हणून गेलो , मुस्लिम विरोधक नाही

0

 

बुलढाणा (Buldhana) : मी 1990 साली अयोध्येत कारसेवेमध्ये गेलो होतो. मी राम भक्त होतो आणि आहे. त्यावेळेस मी राम भक्त म्हणून गेलो होतो, मुस्लिम विरोधक म्हणून गेलो नव्हतो. अशी भूमिकाबुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उम्मेदवार नरेंद्र खेडेकर यांनी व्यक्त केली आहे. खुद्द खेडेकरांनी काही दिवसांपूर्वी भर सभेत आपण कारसेवेत गेलो होतो, आम्ही त्यासाठी रक्तही सांडल्याचा दावा करणारा त्यांचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल झालेला आहे. यामुळे जिल्ह्यातील मुस्लिम मतदार या व्हिडीओमुळे प्रभावित होत असल्याने अखेर उमेदवार खेडेकरांना याबाबत खुलासा करावा लागला आहे. मी 90 ला गेलो होतो 1992 ला बाबरी मशीद पाडली गेली त्यावेळेस तसं काही झालं नव्हते. आणि मी राम भक्त म्हणून गेलो होतो, मुस्लिम विरोधक म्हणून निश्चितच गेलो नव्हतो, असा खुलासा करतांना ते दिसून आले. आता स्वतःच्या नावाने मत मागण्याऐवजी मोदींच्या नावावर मते मागितल्या जात आहे. जिल्ह्यात फिरणारे त्यांचे रथ आले. त्यावरून मतदारसंघांमध्ये मोदी उभे आहे का प्रतापराव हेच समजत नाही. मोदींचा फोटो अतिशय मोठा आहे आणि त्यांचापेक्षा एकदम छोटा लावल्या जात आहे.असेही खेडेकर म्हणाले.