जनता माफ करणार नाही-शिवराय कुलकर्णी

0

 

अमरावती (Amravati) :काल अमरावतीच्या सभेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी महिलांविषयी एक आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर संताप व्यक्त होत आहे. भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेत या वक्तव्याचा निषेध केला. शिवराय कुलकर्णी म्हणाले की, शिवसेना उबाठा गटाचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते खासदार संजय राऊत स्वतःला सर्वज्ञानी समजणारे यांचा अमरावतीमध्ये दौरा झाला. उद्धव ठाकरे शिवसेना उबाठा गट यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. महाराष्ट्रभर त्यांची केविलवाणी स्थिती झाली आहे. संजय राऊत यांनी अमरावतीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविषयी अगदी अभद्र,खालच्या स्तरावरचे अश्लील व्यक्तव्य केले. या वक्तव्यामुळे संपूर्ण स्त्री शक्तीचा, मातृशक्तीचा अपमान झालेला आहे. एका महिलेचा अत्यंत खालच्या दर्जाने अपमान करायचा, गलिच्छ शब्दांचा वापर करायचा ही संस्कृती महाविकास आघाडीची आहे का? असं धोरण स्त्रियांबद्दल महाविकास आघाडीचे आहे का? याचे उत्तर यशोमती ठाकूर आणि जे जे महाविकास आघाडीचे मोठे नेते मंचावर उपस्थित होते त्यांनी जनतेला दिलं पाहिजे. नाहीतर स्त्रियांचा अपमान केला म्हणून महाराष्ट्रातील जनता उबाठा आणि महाविकास आघाडीला कधीही माफ करणार नाही असा इशारा कुळकर्णी यांनी दिला आहे.