मोदींचा नागपुरात मुक्काम

0

 

पंतप्रधान मोदींनी घेतले नागपुरात रात्रीचे जेवण

 

संघ मुख्यालय असलेल्या नागपुरात दुसऱ्यांदा मुक्काम

नागपूर (Nagpur) : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचाराचा नारळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वर्धा येथून फोडला. पूर्व विदर्भातील पहिल्या टप्प्याचे 19 एप्रिल रोजी मतदान असताना वर्धा जिल्ह्यातील तळेगाव श्यामजीपंत येथे वर्धा आणि अमरावती मतदारसंघातील उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतली. त्या नंतर सायंकाळी 6.35 वाजता मोदींचे नागपूर विमानतळावर आगमन झाले. रात्री 8.30 वाजता मोदींनी जेवण घेतले. मोदींचा ऑरेंज सिटी, संघ मुख्यालय असलेल्या नागपुरात दुसऱ्यांदा मुक्काम होता.

पंतप्रधान मोदींच्या नियोजित कार्यक्रमानुसार जबलपूर येथील प्रचार सभेनंतर ४.२० मिनिटांनी ते नागपूर विमानतळावर पोहोचले. तेथून ते हेलिकॉप्टरने वर्ध्याला गेले. सभा आटोपल्यानंतर पावणेसात वाजता हेलिकॉप्टरने नागपुरला परतले व सात वाजताच्या सुमारास राजभवनला पोहोचले. रात्री त्यांचा तेथेच मुक्काम असल्याने कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. त्यांनी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास साधे जेवण घेतले.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात सभा सुरू आहेत. आज परभणी, नांदेडमध्ये मोदींची सभा होत आहे. नांदेडमध्ये मोदींच्या सभेला सुरुवात झाली. मोठ्या संख्येने जनसागर दाखल झाला होता. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सभेला उपस्थित आहेत.