गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यांची सीमा असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर इतर राज्यातून अवैध धंदे चालत असतात आणि जिल्ह्यात होणाऱ्या अवैध धंद्यांना रोखण्यासाठी गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासन दिवसा बरोबर रात्रीच्या वेळेस पेट्रोलिंग करून या अवैध धंदे कसे थांबवता येईल याबाबत कार्य करत असतात आणि अवैध धंदे थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्य करत असतात. मात्र,पोलिसांना अवैध धंदे करणारे मारहाण करत असतील तर काय समजावे ,असा प्रश्न गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना पडला आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भोसा या गावात एक अशीच घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास दोन पोलीस हे पेट्रोलिंग करत असताना अवैध धंदे करीत असलेल्या काही लोकांनी पोलिसाना पाहताच त्यांच्यावर हल्ला करीत पोलिसाना पकडून बांधून ठेवत मारहाण केली या मारहाणी मध्ये दोन पोलीस जखमी झाले याविषयी आमगाव पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी पोचले पोलिसांना पाहताच आरोपीने पळ काढला. पाच आरोपींना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे