अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

0

 

अमरावती AMRAVATI  – अंगणवाडी कर्मचारी संघटना (सिटू) मार्फत अमरावती जिल्ह्यासह राज्यात अंगणवाडी सेविकांनी 4 डिसेंबरपासून संप पुकारला असून, त्या संपाला 41 दिवस होत आहेत. आज अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर 10 सेविका/मदतनिस यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरु केले. आता जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचा संप आणि आमचे साखळी उपोषण सुरूचं राहणार, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

नारायण राणे यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक

बुलढाणा- येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत होत असलेल्या राम मंदिराच्या लोकार्पणापूर्वीच मोठा वाद निर्माण होताना दिसून येत आहेत. राम मंदिराचं बांधकाम अपूर्ण असतानाच प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा नको, अशी भूमिका शंकराचार्य यांनी घेतल्यानंतर मंत्री नारायण राणे यांनी हिंदुत्वासाठी शंकराचार्य यांचं योगदान काय? असा सवाल केल्याने पुन्हा वादाला तोंड फुटले आहे. मंत्री नारायण राणे यांच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला असून राज्यात ठिक ठिकाणी आंदोलने करीत आहेत. नारायण राणे यांच्या विरोधात माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात खामगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर घोषणाबाजी करून नारायण राणे यांचा किशोर अप्पा भोसले, शहराध्यक्ष काँग्रेस, खामगाव यांनी निषेध नोंदविला.