भारत-माल्टा संयुक्‍तपणे करणार विदर्भात औद्योगिक व पर्यटन विकास,एआयडीच्या पुढाकाराने नव्या संधींचा मार्ग मोकळा

0
भारत-माल्टा संयुक्‍तपणे करणार विदर्भात औद्योगिक व पर्यटन विकास,एआयडीच्या पुढाकाराने नव्या संधींचा मार्ग मोकळा

नागपूर[Nagpur], १६ जून २०२५ — भारताच्या जागतिक भागीदारीला नवे बळ देत असोसिएशन फॉर इंडस्‍ट्रीयल डेव्‍हलपमेंट (एआयडी), नागपूरतर्फे विदर्भात औद्योगिक व पर्यटन सहकार्याच्या नव्या वाटा खुल्या करण्यासाठी माल्टा प्रजासत्ताकाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासोबतच बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या विशेष बैठकीसाठी माल्टा प्रजासत्ताकातील आयओडीआरचे गव्हर्नर जनरल प्रो. डॉ. लेलो मारा, आयओडीआरचे डिप्‍लोमॅट व आंतरराष्ट्रीय सचिव इंजि. मार्सेलो पट्टी आणि प्रतिनिधी डॉ. अफझल मिथा यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमाचे आयोजन एआयडीचे अध्यक्ष श्री. आशिष काळे व उपाध्‍यक्ष गिरधारी मंत्री यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या एआयडीने विदर्भाला औद्योगिक विकास, गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय सहयोगासाठी एक महत्त्वाचे केंद्र बनवण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. यावेळी पर्यावरणीय सेवा, संरक्षण उत्पादन, प्लास्टिक व पॅकेजिंग, अन्न प्रक्रिया आणि आयटी-बीपीएम क्षेत्रांतील विदर्भातील प्रगत उद्योगांचे सादरीकरण शिष्टमंडळासमोर करण्यात आले.
विदर्भातील पर्यटन क्षेत्रातील प्रगतीबाबत सविस्‍तर माहिती देण्‍यात आली. विदर्भातील सहा व्याघ्र प्रकल्प, खिंडसी तलावातील साहस पर्यटन केंद्रे, समृद्धी महामार्ग व कार्गो रेल्वेची द्रुत वाहतूक सुविधा, लक्झरी रिसॉर्ट्स तसेच एमटीडीसीची गुंतवणूक यामुळे विदर्भ हा पर्यटनाचा उदयोन्मुख केंद्र म्हणून विकसित होत आहे. यासोबतच कृषी, ग्रामीण व सांस्कृतिक पर्यटनातही या भागाची मोठी क्षमता असल्‍याचे सांगण्‍यात आले.
या भेटीत इको-टुरिझम, सागरी व साहसी पर्यटन, रिसॉर्ट विकास, डिजिटल पर्यटन प्लॅटफॉर्म्स तसेच सांस्कृतिक व शैक्षणिक देवाणघेवाण यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या व्यापक संधींचा आढावा घेण्यात आला. या संवादामुळे व्यापार, तंत्रज्ञान हस्तांतरण व परस्पर गुंतवणुकीसाठी नव्या वाटा खुल्या झाल्या असून त्यातून विदर्भात रोजगार निर्मिती व शाश्वत आर्थिक प्रगतीला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
या प्रसंगी माल्‍टाचे श्री. सॅबॅतिनी, श्री. मोल्टिसँटी सर्जिओ, एआयडीचे मानद सचिव डॉ. विजय कुमार शर्मा व कार्यकारी समिती सदस्यही उपस्थित होते.

Dash act as guides to foreign tourist
Name two types of invisible exports through tourism
TTCI full form in concrete technology