“मोदी शंकराचार्यांपेक्षा मोठे का?..” काँग्रेसचा सवाल

0

मुंबई MUMBAI -अयोध्येतील Ayodhya  २२ जानेवारीच्या सोहळ्यात चारही पीठांचे शंकराचार्य उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावरुन आता काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. (Congress on Ram Mandir Inauguration) “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शंकराचार्यांपेत्रा मोठे आहेत का”,

असा सवाल काँग्रेसने उपस्थित केलाय. अयोध्येतील सोहळ्यात सहभागी होण्यास नकार दिल्यावर टीकेचे लक्ष्य ठरलेल्या काँग्रेसला यानिमित्ताने भाजपवर पलटवार करण्याची संधी मिळाली आहे.

अयोध्येत २२ जानेवारीला रामललांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यावरुन आता राजकारण पाहायला मिळत आहेत. काँग्रेस नेत्यांनी राम मंदिर उद्घटनाचे निमंत्रण नाकारले आहे. त्यामुळे भाजपने काँग्रेसवर हिंदू व रामविरोधी असल्याचा आरोप लावला. काल ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती (Swami Avimukteshwaranand Saraswati) यांनी चारही शंकराचार्य अयोध्येत जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यावरुन आता काँग्रेसने भाजपवर पलटवार केला आहे.

यानिमित्ताने भाजपचे ढोंगी हिंदूप्रेम उघड झाल्याची टीका काँग्रेसने केली आहे. हिंदू धर्मात काय योग्य आणि काय अयोग्य, हे सांगण्यासाठी भाजप आणि मोदी शंकराचार्यांपेक्षा मोठे आहेत का? अपूर्ण बांधकाम झालेल्या मंदिरात प्रतिष्ठापना करणे योग्य नाही, असे स्पष्ट मत चारही पिठाच्या शंकराचार्यांनी व्यक्त केले आहे. भाजपाला रामाबद्दल आस्था नाही पण निवडणुकीत रामाच्या नावाचा वापर करावयाचा आहे. भाजपा संघाचे ढोंगी हिंदू प्रेम उघड झाले आहे, असेही काँग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले