
नागपूर NAGPUR – नागपूरच्या NAGPUR IT आयटी क्षेत्राला बुस्ट देण्यासाठी नागपूर ते सिंगापूर Singapore थेट विमानसेवा सुरू करण्यात यावी, अशाी मागणी असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयन डेव्हलपमेंट (एड) च्यावतीने केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांच्याकडे करण्यात आली.
मिहान येथील एमआरओच्या उद्घाटनाकरीता ज्योतिरादित्य सिंधीया Jyotiraditya Scindia नागपुरात आले असताना असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटचे (एड) अध्यक्ष आशीष काळे यांनी त्यांची भेट घेतली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या ‘खासदार औद्योगिक महोत्सव – ऍडव्हांटेज विदर्भ’ चे येत्या, 27 ते 29 जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले असून त्याचे अधिकृत आमंत्रण आशीष काळे यांनी ज्योतिरादित्य सिंधीया यांना दिले. सोबतच, विमानसेवेसंदर्भातील मागणीचे निवेदन त्यांना सुपूर्द करण्यात आले.
नागपूर मेट्रो सिटी म्हणून वेगाने विकसीत होत असून आयटी हब होण्याच्या मार्गावर आहे. विदर्भाच्या आर्थिक विकास साधायचा असेल आणि आयटी क्षेत्राला प्रोत्साहन द्यायचे असेल तर दक्षिणपूर्व एशियातील सर्वात मोठ्या नविनता, आर्थिक आणि तंत्रज्ञानाचे हब असलेल्या सिंगापूरमध्ये नागपुरातील व्यावसायिकांना आवागमन करणे सोपे व्हावे, नवकल्पनांची आदान-प्रदान व्हावी आणि उद्योगवृद्धीच्या संधी निर्माण व्हाव्या, या उद्देशाने ही विमानसेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी आशीष काळे यांनी केली.
नागपूर विमानतळावरून मध्यपूर्व, युरोप आणि नागपूरला जोडणाऱ्या कतार आणि यूएईला जाण्यासाठी नियमित विमानसेवा सुरू असून त्याच धर्तीवर सिंगापूरला थेट विमानसेवा सुरू करण्यात यावी, असेही ते म्हणाले. केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनीही याला पाठिंबा देणारे पत्र दिले आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. माजी केंद्रीय मंत्री श्री प्रफुल्ल पटेल आणि माजी राज्यसभा सदस्य अजय संचेती यांनी देखील अशा विमानसेवेची तातडीची गरज असल्याचे सिंधीया यांना सांगितले.