Home Artical Blog नागपूरमध्ये ‘जन औषधि हेल्थ चेक-अप दिवस’ उत्साहात संपन्न

नागपूरमध्ये ‘जन औषधि हेल्थ चेक-अप दिवस’ उत्साहात संपन्न

0

नागपूर(Nagpur): जन औषधि दिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या जन औषधि सप्ताहाच्या पहिल्या दिवशी दिघोरी येथे ‘जन औषधि हेल्थ चेक-अप दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी व औषधांचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक पिंटू झलके, डॉ. सतीश मालेकर, डॉ. वाटमुळे यांची उपस्थिती होती. तसेच जन औषधि नोडल ऑफिसर शिवम पाटील, जन औषधि केंद्र संचालक राकेश समर्थ तसेच शहरातील विविध जन औषधि केंद्रांचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना नोडल ऑफिसर शिवम पाटील यांनी सांगितले की, १ ते ७ मार्च दरम्यान संपूर्ण भारतात ‘जन औषधि सप्ताह’ साजरा केला जात आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे स्वस्त व दर्जेदार औषधे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा आहे.

कार्यक्रमादरम्यान नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच आवश्यक त्या औषधांचेही मोफत वितरण करण्यात आले. या उपक्रमाला नागपूरकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.