जयंत तांदुळकर यांनी तयार केला जगातील सर्वात लहान चरखा -लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद

0

 

नागपूर – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नाव जेव्हा तोंडी येते तेव्हा डोळ्यासमोर त्यांच्या सोबतचा चरखाही नक्कीच आठवतो. नागपूरचे रहिवासी जयंत तांदुळकर यांनी देशातील सर्वात लहान चरखा बनविण्याचा विश्वविक्रम केला आहे. हा चरखा इतका लहान आहे की, तो त पाहण्यासाठी तुम्हाला भिंगाचीच गरज पडते. मात्र, हा चरखा मोठ्या चरखाप्रमाणेच काम करतो. या चरख्यापासून धागाही बनवता येतो. या चरख्याची लांबी 3.20 मिमी, रुंदी 2.68 मिमी, उंची 3.06 मिमी आणि त्याचे वजन 40 mg म्हणजेच 0.04 ग्रॅम आहे. या चरख्याचे नाव लिम्का बुकमध्ये देशातील सर्वात लहान चरखा म्हणून नोंदवले गेले आहे. विशेष म्हणजे तांदुळकर यांनी अवघ्या 8 तासात हा चरखा बनवला आहे. पुढ चे पाऊल म्हणजे जयंतने आता त्यापेक्षा छोटा चरखा बनवला आहे. या चरख्याची लांबी 2.94 मिमी, रुंदी 2.40 मिमी, उंची 2.74 मिमी, वजन 30 मिलीग्राम म्हणजेच 0.03 ग्रॅम आहे. ज्याचे नाव जयंतला गिनीज बुकमध्ये नोंदवायचे आहे. जयंतला अशा अनेक छोट्या – छोट्या गोष्टी बनवण्याची बालपणापासूनआवड आहे. जयंत सांगतो की, त्याला अगदी लहानपणापासून हा छंद होता, तो छंद इतका वाढला की, जयंतने अनेक गोष्टी बनवल्य, या सर्व गोष्टी तो विक्रीसाठी नव्हे तर छंद म्हणून करतो. तांदुळकरांना चरखा बनवण्याची प्रेरणा भारताच्या पंतप्रधानांकडून मिळाली. महात्मा गांधींनी ज्याप्रमाणे चरखा फिरवून स्वावलंबी होण्यास सांगितले, त्याचप्रमाणे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वावलंबी होण्यास सांगितल्याचे जयंत म्हणतो