एकोपा कायम राहील आणि आम्ही लोकसभेत जिंकू – यशोमती ठाकूर

0

 

मुंबई- काँग्रेस कार्यकारणीची बैठक सुरू आहे. येणाऱ्या निवडणुकीत महविकास आघाडी तयारीसह मैदानात उतरेल. आमचा एकोपा कायम राहील आणि आम्ही लोकसभेत जिंकू असा विश्वास काँग्रेसच्या नेत्या, माजी मंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केल
संदीप देशपांडे यांना बोलण्याचा सेन्स नाही सेन्सलेस बोलणे कमी केले पाहिजे. ते आमच्या पक्षातील नाही आमच्या पक्षावर त्यांनी बोलू नये. मुळात त्यांच्या कामाकडे त्यांचे लक्ष नाही आणि आमच्या पक्षात उगीचच लक्ष घालतात.
ईडीबाबत बोलताना त्या म्हणाल्या,तुम्ही जर भाजपला काही बोललात तर ते तुमच्या पाठिशी ईडी लावतील. माजी गृहमंत्री जयंत पाटील यांना आपण गेल्या अनेक वर्षांपासून ओळखत आहेत. ते एक सच्चा माणूस आहे. तुम्ही ज्या लोकांवर ईडी लावल्या होत्या त्यांच्या चौकशी पुन्हा सुरू करा. आज मूलभूत अधिकार यावर जरी तुम्ही बोललात तरी तुमच्यावरकारवाई होते.
मोदी संसद भवन उद्घाटन संदर्भात छेडले असता मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पहिल्यांदा डावलले नाही. यापूर्वीही अनेकदा त्यांना डावलले गेले आहे. राष्ट्रपती एक महिला आहेत. आणि महिलेला कसा सन्मान द्यायचा हे कदाचित त्यांना ठाऊक नाही किंवा त्यांच्या संस्कृतीत येत नाही म्हणून ते हे करत असतील. वेल्फेअर स्टेट मध्ये एक प्रोटोकॉल असतो नियमावली असते ती फॉलो केली गेलीच पाहिजे.