काटोल,छिंदवाडा रोड, राजनगर परिसर तासभर अंधारात

0

नागपूर- उपराष्ट्रपती जगदीप धनखड, राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री व राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि अनेक मान्यवर एनएडीटीच्या कार्यक्रमानिमित्त आलेले असताना रात्री सातच्या सुमारास मानकापूर,राजनगर,छावणी, काटोल रोड परिसरात वीज पुरवठा खंडित झाल्याने तारांबळ उडाली.राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचा कार्यक्रम आटोपून व्हीव्हीआयपीचा काफीला राजभवनला जाताना याच स्ट्रीट लाईट बंद असलेल्या रस्त्यावरून मार्गस्थ झाला.बंदोबस्तावरील पोलिसांची यावेळी मोठी तारांबळ उडाली.

 

ठिक ठिकाणी वाहतूक रोखून धरण्यात आल्याने नागरिकांनाही फटका बसला. पुनम चेंबर परिसरातील वीज पुरवठा करणारे फिडर ट्रिप झाल्याने स्ट्रीट लाईट बंद झाल्याची माहिती महावितरण सूत्रांनी दिली. मात्र या परिसरात घरगुती वीज पुरवठा देखील अनेक ठिकाणी सुमारे तासभर खंडित होता.