नाना पाटेकरांच्या हस्ते उद्घाटन
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या मध्य भारतातील सर्वात मोठ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे आज शुक्रवार, 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे. कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांची प्रत्यक्ष तर ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांची आभासी उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीदेखील उपस्थिती राहील. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्थानिक कलाकारांच्या ‘वंदेमातरम्’ हा बहुरंगी कार्यक्रमाने महोत्सवाचे उद्घाटन होईल. यात स्थानिक 1000 कलाकारांचा समावेश असून नृत्य, नाट्य, गायन, वादन आदींचा संगम असलेला हा कार्यक्रम 25 हजार चौ.फूट आकाराचा 11 फूट उंचीचा 4 स्तरीय मंचावर सादर केला जाणार आहे.
याशिवाय, रविवार, 4 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2.30 वाजेदरम्यान होणा-या या गीता पठन महायज्ञ होणार असून याचे उद्घाटन श्रीनाथपीठ, श्री देवनाथ मठ, श्रीक्षेत्र अंजनगाव सुर्जीच्या प. पू. रेणुका मायबाई यांच्या हस्ते होणार असून राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका वंदनीय शांताक्का यांची आभासी उपस्थिती राहणार आहे. महायज्ञाच्या स्वागताध्यक्ष मा. कांचनताई गडकरी आहेत.
भव्य आयोजन
ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे पटांगण २५००० स्क्वेअर फुटांचा भव्य असा हा रंगमंच, २५००० रसिकांसाठी बसण्याची व्यवस्था, जवळपास १००० लाइट्स, ३५० माईक्स, ३५०० स्क्वेअर फुटांचे एल.ए.डी. स्क्रीनस्, ३००० कलाकार असे भव्य आयोजन यंदा राहणार आहे.
मिस कॉल द्या पासेस मिळवा
नागपूरकरांना या सांस्कृतिक महोत्सवाचा आस्वाद घेता यावा, या उद्देशाने यंदा ऑनलाईन माध्यमातून घरबसल्या पासेस मिळवता येणार आहेत. त्याकरीता नागरिकांनी 9158880522 या टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल द्यायचा आहे. याद्वारे पासेस प्राप्त करता येतील.
नागपूर-विदर्भाची व मध्य भारताची शान असलेल्या या खासदार सांस्कृतिक महोत्सवाला नागपूरकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, सर्व उपाध्यक्ष प्रा. मधुप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सर्व सदस्य बाळ कुळकर्णी, सारंग गडकरी, अविनाश घुशे, हाजी अब्दुल कादीर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर, अॅड. नितीन तेलगोटे, विलास त्रिवेदी, आशिष वांदिले, चेतन कायरकर, भोलानाथ सहारे, किशोर पाटील, मनीषा काशिकर यांनी केले आहे
.
वाहन पार्किंग व्यवस्था
संताजी सभाग्रृह – टू व्हिलर/फोर व्हिलन पार्किंग
संत रविदास सभागृह – टू व्हिलर पार्किंग
ओसीडब्ल्यू ऑफिस – टू व्हिलर/फोर व्हिलन पार्किंग
प्रेरणा कॉलेज – टू व्हिलर पार्किंग
नागपूर सुधार प्रन्यास – व्हीआयपी पार्किंग
धन्वंतरी रुग्णालय – शासकीय व पोलीस कर्मचारी वाहन पाकिंग
खासदार सांस्कृतिक महोत्सव वेळापत्रक
2 डिसेंबर – सुविख्यात अभिनेते नाना पाटेकर व सदगुरू जग्गी वासुदेव यांच्या उपस्थितीत उद्घाटन व स्थानिक कलाकारांच्या ‘वंदेमातरम’ या कार्यक्रमाने.
3 डिसेंबर– सेवावस्ती निवासी मुलांचे लघुनाट्य ‘तारे जमीं पर’ व सुप्रसिद्ध गझल गायक पद्मश्री हरिहरन यांची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’.
4 डिसेंबर 2022 – सकाळी 9.30 वाजता गीतापठन महायज्ञ तसेच, सायंकाळी 6.30 वाजता श्याम देशपांडे यांचा ‘जागर राष्ट्रभक्तीचा’ हा कार्यक्रम व अमित त्रिवेदी यांची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’
5 डिसेंबर 2022 – ट्रान्सजेंडर कलावंतांची नृत्य प्रस्तुती व अभिनेते मनोज जोशी यांचे ‘चाणक्य’ हा नाट्य प्रयोग
6 डिसेंबर 2022 – सुरमणी पं. प्रभाकर धाकडे गुरुंजीचे व्हायोलिन वादन व ‘तथागत’ हे महानाट्य.
7 डिसेंबर 2022 – श्री. श्याम देशपांडे यांचा ‘जागर राष्ट्रभक्तीचा’ हा कार्यक्रम व ‘पुण्यश्लोक अहिल्या’ हे महानाट्य
8 डिसेंबर 2022 – छत्तीसगढी पंथी नृत्य व मनोज मुंतशिर यांचा ‘माँ, माटी और मोहब्बत’ हा कार्यक्रम
9 डिसेंबर 2022 – बालकला अकादमी प्रस्तुत ‘तारे जमीं पर’ व प्रसिद्ध अभिनेते व कवी शैलेश लोढा व इतर कवींचे कविसंमेलन
10 डिसेंबर 2022 – सायली उजवणे व निलाक्षी खंडकर यांची शास्त्रीय व उपशास्त्रीय नृत्य प्रस्तुती व सुप्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती यांची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’
11 डिसेंबर 2022 – शिवमुद्रा ढोलताशा पथकाचा ‘शिवशाहीची रणधुमाळी हा कार्यक्रम व गायक मोहित चौहाण यांच्या लाईव्ह कॉन्सर्ट