
(Nagpur)नागपूर – (Prime Minister Narendra Modi)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याणकारी योजनांच्या पोस्टरला,फोटोला काळे फासण्याच्या प्रकरणी (Maharashtra Pradesh Youth Congress State President Kunal Raut) महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कुणाल राऊत यांनी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आंदोलन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळ फासल्यामुळे रविवारी रात्री कुणाल राऊत यांला सदर पोलिसांनी अटक केली होती. एकीकडे भाजपने सोमवारी जिप परिसरात जोरदार ठिय्या आंदोलन करीत कारवाईची मागणी केली. दुसरीकडे आज कुणाल राऊत यांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी न्यायालयाने कुणाल राऊत यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती
कुणाल राऊत यांचे वकील दिपैन जीगैशी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.