बैठकीत कुजबूज : शरद पवार गट कॉँग्रेसमध्ये विलीन होणार? अजित पवारांच्या गटातून राष्ट्रवादी कायम राहणार?

0

किशोर आपटे/ प्रतिनिधी

मुंबई (Mumbai) : लोकसभा निवडणूक  निकाल समजण्यापूर्वीच अजित पवार यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेणारी बैठक घेण्यात आली. निवडणूक निकाल लागल्यावर कोण कोण साथ सोडण्याची शक्यता आहे याची चाचपणी यावेळी झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र शरद पवार गट निवडणूक झाल्यावर कॉँग्रेससोबत विलीन होण्याची शक्यता असून मोठ्या प्रमाणात दोन्ही गटातून इनकमिंग आऊटगोईंग होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

महत्वाचे म्हणजे यावेळी अन्य राज्यातून मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशासाठी युवा नेते उपस्थित राहिले असून काहीचे प्रवेशही झाले आहेत. त्यात  सोनिया दुहान अजित पवारांना अधिकृत पणे या प्रवेशासाठी मदत करत असून राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी त्या हजर असल्याचे सांगण्यात येत आहे. (Sharad Pawar)

अजित पवारांच्या २०९च्या बंडात शरद पवारांसाठी जिवाची बाजी लावणा-या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवती अध्यक्ष सोनिया दुहान  सुप्रिया सुळे यांची सांथ सोडून . राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या पाठोपाठ  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर आहेत. मात्र दुहान यांनी या सर्व चर्चा फेटाळल्या. मात्र सोनिया दुहान अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी हजर असल्याचे सांगण्यात येत आहे. (Congress)

धीरज शर्मा यांच्यानंतर सोनिया दुहान देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र आज दुहान बैठकीसाठी पोहचल्याने  अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झाले.  लोकसभा निवडणुकीत धीरज शर्मा आणि सोनिया दुहान यांनी पक्षापासून अंतर राखल्याची चर्चा आहे. (Ajit Pawar)

सोनिया दुहान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बैठकीसाठी  हजर होत्या अशी सूत्रांची माहिती असून दिल्ली विद्यापीठात दोन निवडणुकांमध्ये  राष्ट्रवादीचं नेतृत्त्व त्यानी केले होते . त्या एकदा राष्ट्रवादीच्या युवती प्रदेश अध्यक्ष राहिल्या. त्यानंतर राष्ट्रीय महासचिव झाल्या. पक्षाच्या युवक संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं. शरद पवारांना आपला गुरू मानतात.  आगामी दिल्ली विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सोनिया यांना जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान निवडणूक आटोपताच शरद पवार गट कॉँग्रेसमध्ये विसर्जित करुन अजित पवार यांना बळ दिले जाण्याची शक्यता असून त्या दिशेने राजकीय पावले टाकण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.