शंखनाद न्यूज चॅनलने दिल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

0
Union Road Transport and Highways Minister Nitin Gadkari
Union Road Transport and Highways Minister Nitin Gadkari

नागपूर, २७ मे: केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Road Transport and Highways Minister Nitin Gadkari) यांच्या वाढदिवसानिमित्त आज (२७ मे) त्यांच्या निवासस्थानी शंखनाद न्यूज चॅनलच्या (Shanknad News Channel) टीमने भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शंखनाद न्यूज चॅनेलने खास वाढदिवसासाठी तयार केलेली चित्रफीत देखील सादर करण्यात आली.

चित्रफीतीत “धापेवाडा ते महाल” (Dhapewada to Mahal) हा गडकरी यांचा प्रवास मांडण्यात आला होता. त्यांच्या सहवासात आलेल्या स्नेहींच्या प्रतिक्रिया आणि बालपणीच्या आठवणी देखील या चित्रफीतीत दाखविण्यात आल्या. या आठवणी आणि जुने किस्से बघून गडकरी भावूक झाले. टीमने केलेल्या या प्रयत्नाचे त्यांनी मनःपूर्वक कौतुक केले.