‘या’ फाउंडेशनचा “एक रुपया दान, कॅन्सर मुक्त अभियानाचा” शुभारंभ

0
'या' फाउंडेशनचा "एक रुपया दान, कॅन्सर मुक्त अभियानाचा" शुभारंभ
launch-of-one-rupee-donation-cancer-mukt-abhiyaan-by-ya-foundation

 

नागपूर (Nagpur) दि. 1 ऑगस्ट :- समाजाने आपल्याला काय दिले? हे म्हणण्यापेक्षा समाजाला आपण काय दिले. याचा विचार होणे आवश्यक आहे. सामाजिक कार्य आपल्या हातून व्हावे ही इच्छा नातेवून देवता लाईफ फाऊंडेशनची स्थापना करण्यात आलेली आहे.

देवता लाईफ फाऊंडेशन ही सामाजिक व सेवाभावी संस्था असून “निराधारांचा आधार या संस्थेचे ब्रियवाक्य आहे ही संस्था गेल्या 9 वर्षापासून 12 वर्षाच्या आतील कॅन्सरग्रस्त असणा-या मुलासाठी सदैव कार्यरत असून 35 मुलाचे संगोपन करीत असून मुलाची संख्या वाढतच आहे सदर संस्था कॅन्सर पिडीत मुलांच्या औषध तसेच ऑपरेशनया खर्च सुध्दा करीत असते.

देवता लाईफ फाऊडेशन (Devta Life Foundation) तर्फे “एक रुपया दान, कॅन्सर मुक्त अभियान” ही लोकसह राबविण्यात येत असून या अभियानाचा शुभारंभ कार्यक्रम दि. 6 ऑगस्ट 2024 रोज मंगळवारला दुधारी 4 वाजता प्लॉट क्र. 42-4 सीताराम भवन, 5 वा माळा, रामनगर चौक नागपूर येथे होणार आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा. श्री. भय्याजी जोशी तसेच कार्यक्रमाचे उद्‌घाटक शासकीय मेडिकल कॉलेज चे अधिष्ठाता मा. डॉ. राज गजभिये उपस्थित राहणार आहेत सदर कार्यक्रमास मा. श्री. शैलेश जोगळेकर, सी.ई.ओ. नॅशनल कॅन्सर इन्स्टियुट तसेच डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे सचिव मा. श्री. डॉ. अशोक पत्की यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या अभियानाचे मुख्य उद‌दिष्ट म्हणजे सर्व युवा पिढीनी एकत्रित येऊन या “एक रुपया दान, कॅन्सरमुक्त अभियानात” मदत करून मोठ्या आजारातून त्यांना मुक्त करणे व जीवनदान देणे त्याकरीता त्या युवा पिढीनी जास्तीत जासा संख्येने जुळावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष किशोर बावणे यानी केले आहे हा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे त्यावर प्रतिबंध व उपचार पध्दतीवर काम करणे हे गौरवास्पद आहे

सदर संस्थेने कॅन्सरग्रस्त मुलांकरीता व त्यांच्या पालकांसाठी गोटाळपांजरी येथे सर्व सोयींयुक्त असलेला केअर सेंटर बांधण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कॅन्सरग्रस्त मुलांच्या पालकांसाठी स्वयंरोजगार सुरु करुन त्याना स्वावलंबी बनवणार असल्याचे तसेच महिलाना शिलाईचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. असे सौ. निलिमा बावणे म्हणाल्या

Nagpur in marathi
Nagpur wikipedia
Nagpur is famous for
Nagpur area
Nagpur which state
Nagpur in which state in Map
Nagpur city area in sq km
Nagpur map