काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळकेंची टीका
बुलढाणा BULDHANA – आळंदी ALANDI येथे वारकऱ्यांवर झालेल्या पोलीस लाठीचार्जचा निषेध सर्व स्तरावरून व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्राला वारकऱ्यांची खूप मोठी परंपरा लाभली आहे आणि त्या परंपरावर घाला घालण्याचे काम कालच्या लाठीचार्जच्या माध्यमातून या शासनाने केले आहे. वारकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या या सरकारला विठ्ठल सुबुद्धी देवो एवढीच प्रार्थना करते. जे आजवरच्या इतिहासात घडलेले नाही, ते न घडलेलं कुकर्म या शासनाने केले आहे. त्यामुळे हे शासन लवकरच इतिहास जमा झाल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात काँग्रेसच्या प्रदेश सचिव ऍड. जयश्री शेळके यांनी टीका केली आहे Let the government who is lathi-charged on the warkars give wisdom to Vitthal..