Home LOCAL NEWS विभागीय परिषदेत लायन्स क्लब ऑफ नागपूरला विविध पुरस्कार

विभागीय परिषदेत लायन्स क्लब ऑफ नागपूरला विविध पुरस्कार

0

नागपूर:- लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या ‘रिजन रिद्धी-सिद्धी अवॉर्ड्स 2025-26’मध्ये उत्कृष्ट सेवा आणि उत्तम व्यवस्थापनाकरिता लायन्स क्लब ऑफ नागपूरला विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
या पुरस्कारांतर्गत ‘अ’ श्रेणीमध्ये वर्षभरातील सातत्यपूर्ण कामाबद्दल क्लबला ‘उत्कृष्ट कामगिरी’ या किताबाने सन्मानित करण्यात आले. शांतता पोस्टर स्पर्धेत ‘सुवर्ण पुरस्कार’, सेवाकार्यासाठी दिला जाणारा सर्वोच्च ‘प्लॅटिनम पुरस्कार’, एलसीआयएफमध्ये योगदान दिल्याबद्दल ‘प्लॅटिनम पुरस्कार’, तसेच सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन आणि फाईलिंगकरिता रवी किशनपुरिया यांना सुवर्ण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वर्षभरातील क्लबच्या उपक्रमांच्या उत्कृष्ट दस्तऐवजीकरणासाठी ‘प्लॅटिनम पुरस्कार’, सर्वोत्कृष्ट रील आणि सोशल मीडियाकरिता गोल्ड पुरस्कार, तर सर्वांगिण कामगिरीकरिता प्लॅटिनम पुरस्कार देण्यात आला. सर्वोत्कृष्ट सचिवचा प्लॅटिनम पुरस्कार गुरसिमरन कौर शिवहरे यांनी पटकावला.
यावेळी बोलताना क्लबचे अध्यक्ष निधीश सावरकर यांनी, सांघिक भावना नेहमी जिंकते, असे सांगत या यशाचे श्रेय संपूर्ण टीमला दिले. तसेच हा पुरस्कार त्यांच्या सेवेप्रती असलेल्या समर्पणाचा परिणाम असल्याचे सांगितले. सचिव गुरसिमरनकौर शिवहरे आणि खजिनदार रवी किशनपुरिया यांची सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. लायन्स डिस्ट्रिक्टचे वरिष्ठ अधिकारी आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी याबद्दल क्लबचे अभिनंदन केले.