21 राज्यांतील 102 जागांसाठी शुक्रवारी मतदान

0

विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघाचा समावेश

2024 लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवार, 19 एप्रिल रोजी 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 102 जागांवर मतदान होणार आहे. 2019 मध्ये भाजपने सर्वाधिक 40, द्रमुकने 24 आणि काँग्रेसने 15 जागा जिंकल्या, तर अन्य पक्षांना 23 जागा मिळाल्या होत्या. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एकूण 1,625 उमेदवार रिंगणात आहेत, त्यापैकी 1,491 पुरुष आणि 134 महिला उमेदवार आहेत. यापैकी केवळ 8% महिला आहेत. राज्यातील पहिल्या टप्प्यासाठी येत्या १९ एप्रिल रोजी मतदान होणार असून विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली-चिमुर, रामटेक आणि भंडारा-गोंदिया या मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.
——————-
मतदारसंघात लीड द्या अन्यथा तिकीट नाही
भाजप आमदारांना पक्षाकडून टार्गेट

भाजपाला काहीही करून महाराष्ट्रातील ४८ पैकी ४५ जागा जिंकायच्या आहेत. यामुळे सगळे रुसवे फुगवे विसरून आमदारांनी कामाला लागावे यासाठी आमदारांनी त्यांच्या मतदारसंघात लीड द्यावे अन्यथा तिकीट नाही अशी तंबीच सर्वांना दिली आहे. लोकसभेला दिलेला उमेदवार आवडीचा असो की नावडीचा त्याला लीड दिले तरच तिकीट नाहीतर आमदारकी धोक्यात अशी परिस्थिती येणार असल्याने या आमदारांनाही पायाला भिंगरी बांधून पळावे लागणार आहे.

उदयनराजे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील
– मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विश्वास

लोकसभा निवडणुकीसाठी माहीतीच्या अनेक उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले. सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मोठ्या मताधिक्याने उदयनराजे निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. अर्ज भरायच्या आधी उदयनराजे भोसले यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं.

मतदान साहित्य घेऊन पोलिंग पार्टी रवाना

चंद्रपूर लोकसभेत 18 लक्ष 37 हजार 906 मतदार

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 19 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लक्ष 37 हजार 906 मतदार आहे. यात 9 लक्ष 45 हजार 736 पुरुष मतदार, 8 लक्ष 92 हजार 122 स्त्री मतदार तर 48 इतर मतदार आहेत.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, वणी आणि आर्णि या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. राजूरा मतदारसंघात 330 मतदान केंद्र, चंद्रपूर मतदारसंघात 383 मतदान केंद्र, बल्लारपूर मतदारसंघात 361 मतदान केंद्र, वरोरा मतदारसंघात 340 मतदान केंद्र, वणी मतदारसंघात 338 मतदान केंद्र तर आर्णि मतदारसंघात 366 मतदान केंद्र असे एकूण 2118 मतदान केंद्र आहेत. या सर्व मतदान केंद्रावर मतदानाचे संपूर्ण साहित्य घेऊन पोलिंग पार्टी रवाना झाल्या आहेत.

मतदान करा ! आकर्षक बक्षिसे जिंका

बाईक, रेसींग सायकल आणि ॲन्ड्राईड मोबाईल

देशाच्या प्रगतीसाठी, ध्येयधोरणे ठरविण्यासाठी मतदान करून आपला सहभाग लोकशाही प्रक्रियेमध्ये नोंदविणे अत्यंत महत्वाचे आहे. 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक 19 एप्रिल 2024 रोजी 2118 मतदान केंद्रावर होणार असून सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘तुमचे मत द्या आणि लकी ड्रॉ मध्ये आकर्षक बक्षिसे जिंका’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तर मतदारांनो, ही स्पर्धा तुमच्यासाठी आहे. बस्स…. 19 एप्रिल रोजी मतदान करून सेल्फी अपलोड करा आणि जिंका बाईक, रेसींग सायकल आणि ॲन्ड्राईड फोन, अशी जाहिरात करण्यात आली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महायुती आणि महाविकास आघाडीचे अनेक उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेत. यासाठी संबंधित उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. महाविकास आघाडीचे उमेदवार बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सुप्रिया सुळे, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे डॉ. अमोल कोल्हे व पुणे लोकसभा मतदारसंघाचे रवींद्र धंगेकर हे तिन्ही उमेदवार आज अर्ज दाखल केले. तर बारामतीतून महायुतीच्या सुनेत्रा पवार, सातऱ्यातून उदयनराजे, रायगडमधून सुनील तटकरे आज उमेदवारी अर्ज दाखल केले.

मोठ्या मताधिक्याने उदयनराजे निवडून येतील
लोकसभा निवडणुकीसाठी माहीतीच्या अनेक उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले. सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मोठ्या मताधिक्याने उदयनराजे निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. अर्ज भरायच्या आधी उदयनराजे भोसले यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं.

तटकरे यांनी केलं शक्तिप्रदर्शन
रायगड लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तटकरे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अलिबाग येथे प्रचार सभा घेत शक्तिप्रदर्शन केलं. लोकसभेची निवडणूक जागतिक पटलावर देशाचे स्थान बळकट करणारी निवडणूक असून, महायुतीच्या माध्यमातून जे काम होतंय. त्यामुळे नक्कीच महायुतीला यश मिळेल, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला यावेळी रायगड आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उद्या सामंत रवींद्र चव्हाण हसन मुश्रीफ आणि महायुतीचे सर्व नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांगली लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांनी आज अर्ज दाखल केला. सांगली लोकसभा मतदारसंघातून 2014 आणि 2019 या लोकसभा निवडणुकीत ते सलग दोन वेळा निवडून आले आहेत. लातूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून आज महायुतीच्या वतीने विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर आदी उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुधाकर शृंगारे यांनी रॅली काढून शक्ती प्रदर्शन केलं.

महाविकास आघाडीच्या विविध उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले. सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात आणि त्याच्यामुळे समोर कोण लढतंय याचा मी फारसा विचार करत नाही. कारण काही वैयक्तिक नाहीच आहे. माझ्यासाठी त्याच्यामुळे आणि तुम्ही माझी सगळी भाषण गेल्या 18 वर्षाची पार्लमेंट मध्ये काढून बघा ती कधीच कुणावर वैयक्तिक टीका केलेली नाही आणि माझ्यावर झालेले संस्कारच नाहीये. त्याच्यामुळे मी संविधानाच्या चौकटीत राहून मायबाप जनतेच्या हिताचीच भाषण आणि त्यांच्यासाठी लढलेले असेही त्या म्हणाल्या.

अमोल कोल्हे यांनी शिरूर मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी पुणे शहर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला काँग्रेसने त्या प्रणिती शिंदे यांनी आज सोलापूर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

आपल्याला पाठिंबा दिल्यामुळे विजय निश्चित
वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघात समनग जनता पार्टीचे उमेदवार प्राध्यापक अनिल राठोड यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश अण्णा शेळके यांच्यात ओबीसी बहुजन पार्टीने आपल्याला पाठिंबा दिल्यामुळे विजय निश्चित असल्याचा विश्वास राठोड यांनी व्यक्त केला लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 35 अधिक जागा मिळणार असून या सर्वाधिक जागा विदर्भातल्या असतील असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी म्हटल आहे त्याच अमरावतीत पत्रकारांशी बोलत होते अमरावती लोकसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी संजय राऊत अमरावती दाखल झाले आहेत मोदी सरकारने केंद्रात एकही चांगलं काम केलेलं नाही त्यामुळे भाजपा सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही अशी टीका त्यांनी केली.

शहा रोडशो घेणार
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराला वेगाला असून सर्वच पक्षांचे उमेदवार प्रचार सभा आणि रोडशो यावर भर देत आहेत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाने नेते अमित शहा आज गुजरात दौऱ्यावर असून त्यांनी गुजरातमधल्या सानंद इथून रोडशोला प्रारंभ केला त्यानंतर त्यांनी गांधीनगर कलोल इथही प्रचार सभा घेतली अहमदाबाद मध्ये देखील शहा रोडशो घेणार आहेत

अजितदादा आणि सुनेत्रा पवार दगडूशेठच्या चरणी
बारामतीतून भरला उमेदवारी अर्ज

आज बारामती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार असलेल्या सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र त्यापूर्वी गुरुवारी सकाळी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारयांनी दगडूशेठचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. आज माझ्यासाठी मोठा दिवस असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या, ‘आज माझ्यासाठी महत्वाचा दिवस आहे. कारण मी आज उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्यामुळे आज आम्ही देवाच्या चरणी प्रार्थना केली.

ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असून, देशाचा योग्य नेता निवडण्याची आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या जाहीरसभेला संबोधित करताना म्हटलं. विकासाला मत द्यायचं की विनाशाला मत द्यायचं हे बारामती करांनी ठरवायचं आहे, असं फडणवीस यावेळी म्हणाले. यंदाचे लोकसभेची निवडणूक भावकीचे नसून, देशाचे भविष्य ठरवणारे असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा सर्वांगण विकास केला असून, आगामी काळात त्यांनी देशाला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्याचा लक्ष ठेवल्याचं पवार म्हणाले. त्यांनी कार्यकर्त्यांना कमी काळात अधिक काम करण्याचा आवाहन केलं. मोदी यांच्या नेतृत्वात आपली महायुती एकनाथरावजी शिंदे असतील, दादा असतील हे सगळे पक्ष मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही काम करतो आहे आणि दुसरीकडे राहुल गांधी आहेत आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये उद्धव ठाकरेचे असतील शरद पवार साहेब असतील किंवा इतर सगळे त्यांच्या आघाडीचे लोक आहेत. आता तुम्हाला बारामतीकरांना निर्णय करायचा आहे. पुण्यात दगडूशेठ गणपती मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनीता पवार यांनी गणपतीचे दर्शन घेतलं.

माझ्यासाठी वैयक्तिक लढाई नाही, ही विचारांची लढाई
– राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेचे प्रातिपादन
माझ्यासाठी वैयक्तिक लढाई नाही, ही विचारांची लढाई आहे. समोर कोण लढत आहे, याचा विचार मी करत नाही. कारण मी वैयक्तिक टीका कधी करत नाही, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. 35 वर्षे आमदार, पालकमंत्री, राहिलेल्या लोकांना माझा कार्य अहवाल पाठवणार आहे. त्यांनी वेळ काढून तो वाचावा बारामतीमध्ये टीमवर्कमुळे मोठा विकास झाला आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

निवडणुकीत मतदारांचे आशीर्वाद मिळावे
मोहन भागवतांसह नेतेही झाले रामचरणी नतमस्तक
यावर्षी लोकसभा निवडणुकीचा प्रचार रामनवमीला सायंकाळी थांबला. २१ रोजी मतदान असल्याने झाडून सारे नेते रामचरणी लिन झाले. दसरा उत्सवात सरसंघचालक मोहन भागवत यांनी थेट १००% टक्के मतदानाचे आवाहन केले होते. रामनवमीला अयोध्येतील बालरामाच्या कपाळावर माध्यान्ही सूर्यकिरण पडले. िनवडणुकीत राम राहावा म्हणून नागपुरात पोद्दारेश्वर राम मंदिराच्या शोभायात्रेत उपस्थित राहात सरसंघचालक मोहन भागवत यांनीही रामाला साकडे घालीत सर्वोत्तम पर्याय निवडण्याचा संदेश दिला. रामनवमी निमित्या नागपूरचे महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील विविध मंदिरात जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले.

रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून अखेर नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर
किरण सामंत यांची माघार
भारतीय जनता पक्षाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे किरण सामंत यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र, भाजप आणि शिवसेना यांच्यातील तिढा आता सुटला असून किरण सामंत यांनी माघार घेतला असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. त्यानंतर लगेचच भारतीय जनता पक्षाच्या वतीने नारायण राणे यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे महायुतीमधील हा कोकणातील तिढा सामांजस्याने सुटला असे म्हणावे लागेल.

प्रचार संपला, 19 एप्रिलला मतदान
प्रशासन सज्ज, २१ हजारांवर कर्मचारी तैनात

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठीचा प्रचार बुधवारी सायंकाळी ५ वाजता संपला. आता प्रशासन मतदानासाठी सज्ज झाले आहे. निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी याबाबत बुधवारी सविस्तर माहिती दिली. यावेळी ग्रामीण पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार उपस्थित होते.

‘त्या’ मतदारांच्या नखावर टिंबाऐवजी लावणार पूर्ण शाई
दोन्ही राज्यांत मतदान करू नये म्हणून उपाय
महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवरील वादग्रस्त १४ गावांत पाच हजारांपेक्षा अधिक मतदार आहेत. मतदारांनी दोन्ही राज्यात मतदान करू नये म्हणून मतदान केल्यावर डाव्या हाताच्या एका बोटावर नेहमीप्रमाणे केवळ टिंब न लावता त्या नखावर पूर्ण काळी शाई लावण्यात येईल, अशी माहिती चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिली. चंद्रपूर मतदारसंघात १८ एप्रिलला तर तेलंगणामधील आसिफाबाद मतदारसंघात १३ मे रोजी मतदान आहे.

 

ईडीने शिल्पा शेट्टीची 97 कोटीची मालमत्ता जप्त
मुंबईतील फ्लॅट, नवऱ्याच्या पुण्यातील बंगल्याचाही समावेश

अंमलबजावणी संचालनालयाने शिल्पा शेट्टी आणि त्यांचे पती राज कुंद्रा यांची 98 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये शिल्पा शेट्टीचा जुहू फ्लॅट आणि बंगला आणि राज कुंद्राच्या नावावर नोंदणीकृत इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. हे प्रकरण 2002 च्या बिटकॉइन पॉन्झी स्कीम घोटाळ्यातील मनी लाँड्रिंगशी संबंधित आहे. ईडीने ही माहिती दिली आहे. व्हेरिएबल टेक प्रायव्हेट लिमिटेड आणि आरोपी दिवंगत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज, सिम्पी भारद्वाज, महेंद्र भारद्वाज आणि इतरांविरुद्ध महाराष्ट्र पोलिस आणि दिल्ली पोलिसांकडे दाखल केलेल्या अनेक एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरू केला होता.