ऑक्टोबरमध्ये होणार लोकसभेच्या निवडणुका- ऍड प्रकाश आंबेडकर

0

 

अकोला – येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये होणार लोकसभेच्या निवडणुका होणार असून यासाठीच 2000 च्या नोटा बंद करून निवडून येण्यासाठी भाजपचे चोकिंग राजकारण सुरू आहे. विरोधकांकडे निधीच येऊ नये.या दृष्टीने टाकलेला हा डाव आहे.
त्यामूळे येथील राजकीय पक्षाने गाफील राहू नये असे प्रतिपादन वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष माजी खासदार अड प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

संजय राऊत यांनी निवडणूक लढवावी – आनंद जाधव

 

नांदेड- संजय राऊतांनी मागच्या दाराने येऊन मतदान घेऊन खासदारकी मिळवली आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये येऊन निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान शिवसेना उपनेते आनंद जाधव यांनी पत्रपरिषदेत दिले आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी नांदेड येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये त्यांनी हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील व नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्यावर अशी टीका केली होती की, या दोन्ही गद्दारांना आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये संपल्याशिवाय शांत बसणार नाही यावर जाधव यांनी हे प्रत्युत्तर दिले