jayant patil जयंत पाटील चौकशीसाठी ईडीपुढे हजर

0

मुंबईः माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले (NCP Leader Jayant Patil Appeared before ED) आहेत. आयएलअँडएफएसशी (IL&FS Case) संबंधित गैरव्यवहारप्रकरणी आज त्यांची चौकशी सुरु आहे. ईडीच्या दाव्यानुसार, कंपनीने अनेकांना नियमबाह्य पद्धतीने कर्जवाटप केले असून त्यात जयंत पाटील यांचे नावही समोर आल्याची माहिती आहे. दरम्यान, जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून राज्यभर आंदोलन करण्याची घोषणा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे. मुंबईत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएलअँडएफएस मध्ये कथित कर्ज घोटाळा आणि मनी लाँड्रिंगचे प्रकरण 2019 मध्ये उघडकीस आले होते. प्रथम स्थानिक स्तरावर तपास करण्यात आला. त्यात सापडलेल्या माहितीच्या आधारे नंतर दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या मूहाच्या कंपन्या आयआरएल आणि आयटीएनएल आणि या कंपन्यांमध्ये नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आयएलअँडएफएसशी ने कोहीनूर सीटीएनएल ला कर्ज दिले होत आणि त्यात इक्विटी गुंतवणूक केली होती. मात्र, सीटीएनएलने कर्ज भरण्यात चूक केली आहे. याच प्रकरणात जयंत पाटील यांचेही नाव समोर आल्याचे ईडीने म्हटले आहे. तर माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नसून मी या कंपनीकडून कोणतेही कर्ज घेतले नसल्याचा जयंत पाटील यांचा दावा आहे.