Home entertainment महाज्योती’मुळे बहुजन विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला बळ

महाज्योती’मुळे बहुजन विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला बळ

0

कौशल्य, स्पर्धा आणि संशोधनाची त्रिसूत्री

स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून शासकीय सेवेत प्रवेश आणि कौशल्याधारित प्रशिक्षणातून आत्मनिर्भरतेचा मार्ग या दुहेरी शक्तीच्या आधारावर बहुजन समाजातील तरुणांचे भविष्य घडविण्याचे मोलाचे कार्य नागपूरची महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) गेल्या सहा वर्षांपासून प्रभावीपणे करीत आहे. शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि कौशल्य विकास यांचा समन्वय साधत ‘महाज्योती’ने हजारो युवक-युवतींना केवळ नोकरीच नव्हे, तर सक्षम करिअरची दिशा दिली आहे.
‘महाज्योती’ने कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीचा मजबूत पाया उभा केला आहे. माहिती तंत्रज्ञान, आरोग्यसेवा, वस्त्रोद्योग, वित्त, वाहतूक आणि हस्तकला अशा ६० हून अधिक क्षेत्रांत प्रशिक्षण देत १८ हजार ७७८ विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून दिला आहे, तर २१ हजार ६६० युवकांनी स्वयंरोजगाराचा मार्ग स्वीकारला आहे. शासनाच्या नियमांनुसार पारदर्शक पद्धतीने राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमामुळे युवक आत्मनिर्भरतेकडे वेगाने वाटचाल करत आहेत. संस्थेच्या कार्यपद्धतीत गुणवत्ता आणि पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. ‘महाज्योती’ ही संस्था सेक्टर स्किल कौन्सिल, इंडो जर्मन टूलरूम आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग यांच्यामार्फत कौशल्य विकास प्रशिक्षण आयोजित करते. केंद्र सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने कौशल्य विकासासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद आणि विविध क्षेत्रांसाठी ३६ सेक्टर स्किल कौन्सिलची स्थापना केली आहे. ही यंत्रणा सार्वजनिक-खाजगी भागीदारीवर आधारित आहे. यामध्ये केंद्र शासनाच्या कौशल्य विकास मंत्रालय, एमएसएमई, कामगार आणि रोजगार मंत्रालयासोबत क्रेडाई, नॅसकॉम, सीआयआय, फिक्की, असोचॅम अग्रगण्य संस्थांचा समावेश आहे.द्र शासनाच्या स्किल इंडिया अंतर्गत तयार करण्यात आलेल्या स्किल इको सिस्टीमच्या लाभ राज्यातील युवकांना व्हावा यासाठी ‘महाज्योती’ प्रत्यनरत आहे. केंद्र शासनाच्या या सेक्टर स्किल कॉन्सिल मार्फत राज्य शासनातील कौशल्य विकास विभाग, लिडकॉम, शबरी आदिवासी महामंडळ विविध राज्यातील समग्र शिक्षा अभियान त्यांचे कौशल्य विकास कार्यक्रम राबवितात. केंद्र शासनाच्या पीएम विश्वकर्मा, पीएम कौशल्य विकास योजना, पीएम कौशल्य केंद्र, स्वदेश, स्पेसिफाइड स्किलड वर्कर या योजना ‘एनएसडीसी’च्या स्किल इकोसिस्टिम द्वारे राबविल्या जातात. सेक्टर स्किल कॉन्सिल मार्फत अभ्यासक्रम निर्मिती, प्रशिक्षण आणि मुल्यमापण या प्रक्रिया त्या क्षेत्रातील कुशल संस्थाकडून राबविल्या जातात.
६ वर्षांत २ हजार ३५० शासकीय सेवेत
बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी ‘महाज्योती’ ही केवळ प्रशिक्षण देणारी संस्था न राहता संधींचे सर्वसमावेशक केंद्र बनलेली आहे. स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात संस्थेने भक्कम कामगिरी केली असून, संघ लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, बँकिंग, कर्मचारी निवड आयोग तसेच विविध राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांसाठी दिल्या जाणाऱ्या दर्जेदार प्रशिक्षणामुळे २०२१ ते २०२६ या कालावधीत तब्बल २ हजार ३५० हून अधिक विद्यार्थी शासकीय सेवेत दाखल झाले आहे. विशेष म्हणजे, २०२५ मध्ये ३२ विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करीत प्रशासनात ठसा उमटविला आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम करण्यासाठी ‘महाज्योती’ने केवळ मार्गदर्शनच नव्हे, तर सर्वंकष आधारव्यवस्था उभी केली आहे. मोफत प्रशिक्षण, विद्यावेतन, आकास्मिक निधी, डिजिटल साधने, इंटरनेट सुविधा आणि दर्जेदार अभ्यास साहित्यामुळे विद्यार्थ्यांसाठीही यशाची दारे खुली झाली आहेत. संशोधन क्षेत्रातही ‘महाज्योती’ने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पीएच.डी. शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत २ हजार ७७९ विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य देण्यात आले असून, ६०३ संशोधकांनी आपले संशोधन पूर्ण केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन सादर करणारे विद्यार्थिनी या प्रवाहातून पुढे येत असून,ज्ञाननिर्मितीत बहुजन विद्यार्थ्यांचा सहभाग वाढत आहे.
वैमानिक प्रशिक्षणातून स्वप्नांना नवे पंख
ग्रामीण आणि शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी ‘महाज्योती’ने राबविलेला वैमानिक प्रशिक्षण उपक्रम विशेष ठरला आहे. राज्यातील १६ विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. अत्यंत खर्चिक असलेले हे प्रशिक्षण सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देत संस्थेने सामाजिक समतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांपैकी १६ विद्यार्थी लवकरच व्यावसायिक वैमानिक म्हणून कार्यरत होण्याच्या मार्गावर आहेत. हा उपक्रम ‘महाज्योती’च्या दूरदृष्टीचा आणि विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिलेल्या बळाचा प्रेरणादायी नमुना ठरतो. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणक्रांतीच्या विचारांना आधुनिक स्वरूप देत ‘महाज्योती’ आज बहुजन विद्यार्थ्यांसाठी परिवर्तनाची सशक्त प्रेरणा बनलेली आहे. स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास आणि संशोधन या तिन्ही आघाड्यांवर भक्कम पायाभरणी करत ही संस्था समाजाला नव्या उंचीवर नेणारी प्रभावी दिशा ठरत आहे. बहुजन विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आकार देत आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत ‘महाज्योती’ची भूमिका अधिकाधिक महत्त्वाची ठरत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
मिलिंद नारिंगे
व्यवस्थापकीय संचालक
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती),
 महाराष्ट्र राज्य, नागपूर
प्रति,
१) मा. संपादक,प्रिंट, ईलेक्ट्रानिक, डिजीटल माध्यम
२) मा.संचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई
३) मा.जिल्हा माहिती अधिकारी (सर्व जिल्हे)
मा.महोदय, कृपया उपरोक्त वार्तांकनास आपल्या माध्यमात प्रसिद्धी करावे ही नम्र विनंती.
#Mahajyoti #MahajyotiNagpur #SkillIndia #SkillDevelopment #UPSC2025 #MPSC #GovernmentJobs #AatmanirbharBharat #YouthEmpowerment #MahatmaPhule #SavitribaiPhule #EmploymentGeneration #VocationalTraining #CompetitiveExams #CareerSuccess #NagpurNews #MaharashtraGovernment #PhDResearch #PilotTraining #SocialJustice #SelfReliantIndia #EducationRevolution #SkillEcosystem #NationalSkillDevelopment #BrightFuture #YouthOfIndia