

नागपूर(Nagpur), दि. 24 फेब्रुवारी,2026:- महाराष्ट्रातील एक थोर संत, समाजसुधारक आणि लोकशिक्षक, अंधश्रद्धा, अज्ञान, व्यसनाधीनता यांसारख्या सामाजिक कुप्रथांविरुद्ध आपल्या कीर्तनांद्वारे आणि कृतीतून जनजागृती करणा-या संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त महावितरणतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले.
महावितरणच्या काटोल मार्गावरील विद्युत भवन या मुख्यालयात अधीक्षक अभियंता मंगेश वैद्य यांनी गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले, यावेळी सहायक मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) महेश जाधव, कार्यकारी अभियंता अजित जिचकार, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) सुधीर टेकाम, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, प्रणाली विश्लेषक प्रविण काटोले यांचेसह अधिकारी व कर्मचा-यांनी देखील गाडगे महाराज यांना अभिवादन केले.
गाडगे महाराज यांना अभिवादन करतांना महावितरणचे अधिकारी

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर
Related posts:
मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे
May 22, 2026Artical Blog
नगर राजभाषा कार्यान्वयन समिति (नराकास-2), नागपुर की छमाही बैठक एवं पुरस्कार वितरण समारोह संपन्न
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog

















