विधानभवनासह संपूर्ण शहरातील मॅनहोल कव्हर्स निकृष्ट दर्जाचे

0

जनमंचाचा गंभीर आरोप, चौकशीची मागणी


नागपूर. प्रकृती अस्वास्थ्यामुळे माजी मंत्री बबनराव पाचपुते (Former Minister Babanrao Pachpute ) यांना विधान भवनातूनच (From Vidhan Bhavan ) रुग्णालयात हलवावे लागले. रुग्णालयातून नेत असताना मॅनहोल कव्हर तुटले आणि चाक तिथेच अडकून पडले. धक्का मारून रुग्णावाहिकेला वाट करून दिली गेली. पण, या घटनेमुळे मॅलहोल कव्हर्सच्या दर्जाचा (Quality of manhole covers) विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर जनमंचकडून शहराच्या विविध भागांत फिरून मॅनहोर्सचा पाहणी केली गेली. त्यात एकतर सुमार दर्जा शिवाय दोषपूर्ण मांडणीची बाब समोर आली आहे. ठरवून दिलेल्या निकषांनुसार कव्हर्स का लावले जात नाहित, असा प्रश्न उपस्थित करीत चौकशीची मागणीही जनमंचने केली आहे. शहरात अनेक ठिकणी मॅहोल्स उघडेच असून ते धोकादायक ठरले आहेत. यापूर्वीही कव्हर्स नसलेले मॅनहोल अपघाताठी कारणीभूत ठरले असून काहींना जीवही गमवावा लागला आहे.
या सर्व प्रकाराची चौकशी करा व आयएसआय मार्क असलेलेच मॅनहोल कव्हर्स व फ्रेम वापरणे बंधनकारक करून नागरिकांच्या जीवाशी चाललेला हा खेळ थांबविण्याची मागणी जनमंचचे अध्यक्ष राजीव जगताप, महासचिव विठ्ठलराव जावळकर, उपाध्यक्ष मनोहर रडके, दादा झोडे, प्रा. शरद पाटील, प्रमोद रामेकर, राम आखरे, प्रशांत कडू, मनोज चटप, मोहन शिंदे आदींनी केली आहे.

प्रचंड भ्रष्टाचाराचा आरोप


सिमेंटच्या मॅनहोल कव्हर्स व फ्रेम निकष निश्चित आहेत. त्यानुसार आयएएस मार्क असलेले मॅनहोल कव्हर्स व फ्रेम वापरणे बंधनकारक आहे. पण, ते कुठेही वापरले जात नाही. संबंधित अधिकारीही त्याकडे दुर्लक्ष कराता. यामागे हितसंबंध लपले असून प्रचंड भ्रष्टाचार सुरू असल्याचे आरोप जनमंचने केला आहे.
जनमंचने उपस्थित केलेले मुद्दे
1)सिमेंटच्या मॅनहोल कव्हर्स व फ्रेम साठी IS 12592:2002 हे ISI चे निकष असताना ISI मार्क असलेले मॅनहोल कव्हर्स व फ्रेम न वापरण्यामागे कोणाचे हितसंबंध लपलेले आहेत.
2) मॅनहोल कव्हर चे लोड टेस्टिंग करण्यात येते काय?
3) मॅनहोलचे कव्हर हे रस्त्याच्या लेव्हलला असले पाहिजे हे अधिकाऱ्यांना समजत नाही काय?
4) नवीन झालेल्या सिमेंट रस्त्यांवरचे सुद्धा मॅनहोल कव्हर इतक्या लवकर कसे काय तुटलेले आहेत ?
5)संपूर्ण शहरासाठी मॅनहोल च्या फ्रेम व कव्हरचे सारखे निकष का नाहीत?

शाकशुका आणि वेजिटेबल औग्रेटिन रेसिपी | How to make Shakshuka egg & Vegetable Au Gratin Recipe|Epi.60