अमरावती – हिंदूंच्या सण उत्सवाच्या कार्यक्रमात सक्रियपणे काम करणारा विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता मनोज सोनी वय३०वर्ष यांची हत्या ही क्षुल्लक कारणातून झालेली नसून ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात आडकाठी आणल्यानेच त्यांचा प्री प्लान मर्डर केला असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते व खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी केला आहे. अमरावती येथील भाजी बाजार परिसरात राहणाऱ्या मनोज सोनी यांची हत्या उघडकीस आल्यानंतर बोंडे यांनी सोनी यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देत कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले. या प्रकरणी अमरावती पोलिसांनी २ आरोपींना अटक केली असून सर्व प्रकारे तपास सुरू असून एका अपघातात मध्यस्थी करत असतांना ही हत्या झाली अशी माहिती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा यासंदर्भात माहिती देणार असल्याचे अनिल बोंडे यांनी सांगितले.