मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीसाठी 123 गावातील मराठा समाजबांधव

0

जालना JALNA – मराठा आंदोलन मनोज जरांगे Manoj Jarange यांच्या उपस्थितीत 123 गावातील मराठा समाज बांधवांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी मराठा बांधव आता उपोषण स्थळी येण्यास सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे मराठा बांधवांना काय कानमंत्र देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आरक्षणाच्या भूमिकेवर सरकारने मागितलेल्या मुदतीला येत्या 24 ऑक्टोबरला चाळीस दिवस पूर्ण होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मराठा बांधवांच्या भेटीगाठीचा मनोज जरांगेचा दुसऱ्या टप्प्यातील दौरा पूर्ण झाला आहे. मराठा आरक्षणाबाबत शासनाने अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट न केल्याने मराठा आरक्षणाच्या पुढील वाटचाली बाबत व आंदोलनाच्या भूमिकेबाबत मनोज जरांगे आपली पुढील भूमिका आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करणार आहेत.