दसरा मेळाव्यातून २०२४ च्या परिवर्तनाची सुरुवात – संजय राऊत

0

 

मुंबई MUMBAI – दसरा मेळावा दोन वगैरे काही नाही. दसरा मेळावा एकच आहे. बाकी सगळा चायनीज माल. परंपरेनुसार दसरा मेळावा एकच होतोय. आमचा अभूतपूर्व असा दसरा मेळावा यंदा देखील होईल.या मेळाव्यातून २०२४ च्या परिवर्तनाची सुरुवात होणार. दुसरं काही कोणी करत असेल तर आम्हाला त्याविषयी बोलण्याची गरज नाही असे प्रतिपादन SANJAY RAUT  खा संजय राऊत यांनी केले. डुप्लीकेट माल बाजारात येतो आणि त्याचा किती काय आवाज असतो हे तुम्हाला माहितच आहे.उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे अख्या जगाचे लक्ष लागलेलं आहे. सध्या तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास देण्याच काम सध्या सुरू आहे. DEVENDRA FADNVIS फडणवीस म्हणतात तो शिवसेनेचा शहर प्रमुख होता. मात्र, तो साधा गटप्रमुख देखील नव्हता. किती खोटं गृहमंत्री बोलत आहेत.

त्यांचा त्यांच्या खात्यावर कंट्रोल नाही. ते अपयशी ठरले आहेत. पोलिसांनी निःपक्षपाती चौकशी करावी, आता या सरकारमधल्या मंत्र्यांना घाम फुटला आहे. नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यातील गुन्हेगारी कोण पोसत आहे. तुम्ही गुंडांचे पोशिंदे आहात. मुलुंडचा पोपटलाल म्हणत होता याला जेलमध्ये टाकणार. त्याला जेलमध्ये टाकणार, आता मंत्रिमंडळात आहेत, बोल ना हिंमत असेल तर.जनतेला कळतेय राहुल शेवाळे, अजित पवार, हसनमुश्रीफ अशा अनेक नेत्यांवर अटकेची टांगती तलवार होती. यांना आधी सरळ करा. मंत्रिमंडळात बसले आहेत त्यांना. कसे कोणाला हप्ते जात होते, ते लवकरच सगळं समोर येईल.दादा भुसे घेऊन आले होते की, हा आपला खास माणूस आहे. असं आम्हाला सांगण्यात आलं होतं, ती माणस कोण? असा सवाल ललित पाटील संदर्भात संजय राऊत यांनी उपस्थित केला.