खामगावात विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन

0

 

बुलढाणा BULDHANA  – विजयादशमीच्या VIJAYADASHMI पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक  RSS संघ बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव नगराच्यावतीने आज शहरातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक नगर परिषद शाळा क्रमांक 6 मैदान येथुन पथसंचलनाला सुरूवात करण्यात आली. पथसंचलन कमान गेट, जगदंबा चौक, सरकी लाईन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोरुन मस्तान चौक, फरशी मार्गाने मार्गक्रमण करीत शाळा क्र 6 येथे संघ गीत व भगव्या ध्वजाला प्रणाम करून पथसंचलनाचा समारोप करण्यात आला. ठिकठिकाणी संघ स्वयंसेवकांवर पुष्पवर्षाव करून नागरिकांनी स्वागत केले.