मराठा सर्वेक्षण करणार्‍या शिक्षकाला मारहाण; जिजाऊनगरातील घटना

0

 

यवतमाळ – मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सध्या सर्वेक्षण करण्यात येत आहे. यवतमाळ शहरातील जिजाऊनगरात सर्वेक्षणाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या एका शिक्षकाला कोणत्याही प्रकारची माहिती न देता अश्‍लील शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली. आशीष नामक इसमाने कोणतीही माहिती दिली नाही. उलट घराबाहेर येत मारहाण केली. ही घटना घडत असताना सोबत असलेल्या शिक्षकाने व्हिडीओ बनविला. या घटनेमुळे घाबरलेल्या शिक्षकाने पोलिस ठाण्यात धाव घेतली . सर्वेक्षण करीत असताना जिवाला धोका निर्माण झाला. त्यामुळे संरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे.