
चंद्रपूरच्या अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी पुरातन देवी महाकाली मंदिरात स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला. अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने सध्या राज्यात मंदिर स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनानुसार आ. जोरगेवार यांनी मंदिरात श्रमदान केले. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवी महाकाली मंदिरातील स्वच्छता मोहिमेत शेकडो नागरिक सामील झाले