MLA Sudhakar Adabale : शिक्षकांच्या समस्या तात्काळ सोडवा 

0

आश्रमशाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्‍यांबाबत समस्‍या निवारण सभा

चंद्रपूर (Chandrapur) :विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा उपक्रम “समस्‍या तुमच्या, पुढाकार आमचा” अंतर्गत सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले (MLA Sudhakar Adabale) यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर व चिमूरअंतर्गत आश्रमशाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्‍यांबाबत समस्‍या निवारण सभा १८ सप्टेंबर रोजी प्रकल्‍प कार्यालय सभागृह, चंद्रपूर येथे पार पडली. या समस्या निवारण सभेत चंद्रपूर व चिमूर प्रकल्पातील शिक्षकांच्या समस्या तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले.

सभेत माध्यमिक शिक्षकांना ४८००/- ग्रेड- पे लागू करणे, जीपीएफ व डीसीपीएस च्या पावत्या तात्काळ देणे, एकस्तर वेतनश्रेणी लागू करणे, सेवा पुस्तिका पडताळणी करणे, कर्मचाऱ्यांचे वेतन एक तारखेला अदा करणे, सेवानिवृत्ती प्रकरणे तात्काळ मंजूर करणे, कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रस्ताव निकाली काढणे, वैद्यकीय प्रतिकृती प्रस्ताव देयके निकाली काढणे, कार्यरत कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा वेतन, वैद्यकीय रजा, प्रसुती रजा व इतर रजा प्रलंबित कर्मचाऱ्यांची माहिती देणे, प्रकल्पातील मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ देणे, कर्मचाऱ्यांची मूळ सेवा पुस्तिका तयार करून त्यांना दुय्यम प्रत अद्यावत करून देणे, वेतन बिल वेळेवर न देणाऱ्या मुख्याध्यापकावर कारवाई करणे, माहे जुलै ची वेतन वाढ लावूनच बिल स्वीकारने व इतर वैयक्तिक समस्यावर चर्चा करून सदर समस्या तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश चंद्रपूर व चिमूर प्रकल्प अधिकाऱ्यांना आमदार श्री. सुधाकर अडबाले यांनी दिले.

सर्व प्रलंबित समस्या लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन सभेत प्रकल्प अधिकारी चंद्रपूर व चिमुर यांनी दिले. सभेला चंद्रपूर व चिमूर प्रकल्प अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी महामंडळ सहकार्यवाह जगदीश जुनगरी, जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, कार्याध्यक्ष लक्ष्मणराव धोबे, जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, कोषाध्यक्ष दिगांबर कुरेकार, महानगर कार्यवाह सुरेंद्र अडबाले, कनिष्ठ महाविद्यालयीन प्रतिनिधी प्रा. ज्ञानेश्वर सोनकुसरे, सावली तालुका अध्यक्ष विनोद मानापुरे, आदिवासी संस्कृती संघटनेचे भोजराज फुंडे, अनुदानित / शासकीय आदिवासी आश्रमशाळा संघटना चंद्रपूरचे अध्यक्ष प्रमोद साळवे, सचिव मनोज आत्राम, कार्याध्यक्ष चंद्रभान वरारकर, उपाध्यक्ष शंकर लोनगाडगे, प्रभाकर वडस्कर, सुरेश वरारकर, सदस्य युवराज मेश्राम, गोपाल बोबाटे, बजरंग जेणेकर, प्रा. रवी झाडे, दिलीप मोरे, आश्रमशाळा मुख्याध्यापक व समस्याग्रस्त शिक्षक उपस्थित होते.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा