मराठी पाट्यांवर मनसे आक्रमक

0

 

(nashik)नाशिक : मराठी पाट्यांच्या मुद्यावर मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. मुंबई, ठाण्यासोबतच आता नाशिकमध्येही मनसेने आंदोलन केले. (Nashik News) कॉलेज रोड परिसरात मनसेने आंदोलन केले आहे. इंग्रजी पाट्यांना काळे फासत मनसैनिकांची जोरदार घोषणाबाजी केली आहे. मराठी पाट्या लावा नाहीतर तुमच्या तोंडाला काळे फासले जाईल, असा इशारा मनसेने दिला आहे. येत्या दहा दिवसात मराठी पाट्या दिसल्या नाहीत तर मनसे खळखट्याक स्टाईलने उत्तर देईस असा इशारा देण्यात आला आहे.

मनसेने यासंदर्भात राज्यभर आक्रमक भूमिका घेतली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मुंबईसह राज्यातील व्यापारी संघटनेला दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे निर्देश दिले होते. मराठी पाट्या लावण्याची २५ नोव्हेंबर ही अंतिम मुदत होती. सर्व शहरातील अनेक दुकाने, संस्था, आस्थापना मध्ये मराठी भाषेत पाट्या लावणे व व्यवहार करणे हे दुकान व संस्था अधिनियम 1948 अन्व्ये बंधनकारक आहे, असे असतांना देखील शहरातील अनेक दुकाने, संस्था, आस्थापना वर कुठलीही कार्यवाही महापालिकेकडून होताना दिसत नसल्याचाही आरोप यावेळी मनसेकडून करण्यात आला.