“तर सत्ता आली असती..”, तटकरेंचा पृथ्वीराज चव्हाणांना टोला

0

 

कर्जत : (NCP)राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार पाडले नसते तर सरकार टिकले असते व महाराष्ट्र आरक्षणही टिकविता आले असते, असा दावा (Former Chief Minister and senior Congress leader Prithviraj Chavan)माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी उत्तर दिले आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा झाली होती. काँग्रेसचे दुसरे नेते मुख्यमंत्री होणार होते , राष्ट्रवादीने त्याला संमती दिली होती. शपथविधीचा दिवस ही ठरला होता. परंतु परदेशात असलेले काँग्रेसचे नेते परत आल्यावर त्या निर्णयात बदल झाला. कदाचित तो बदल होऊन जर निर्णय झाला असता तर राज्यात सत्ता आली असती, असे सुनील तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे दोन दिवसीय वैचारीक मंथन शिबीर कर्जत येथे सुरु आहे. या शिबीरात बोलताना तटकरे यांनी हा खुलासा करीत पृथ्वीराज चव्हाणांवर निशाणाही साधला. दरम्यान, आपण सत्तेसाठी सहभागी झालो अशी टीका होते आहे. (Ajit Pawar)अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विस्तारासाठी काहीच काम केले नाही, असे आयोगात सांगण्यात आले. याचे खूप दुख वाटते, असे ते म्हणाले. दरम्यान, २००४ साली मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झाला असता. परंतु तसे होऊ दिले नाही. ते का नाही होऊ दिले नाही याचे स्पष्टीकरण अजितदादा तुम्ही आता द्यायला हवे, असे वक्तव्यही तटकरे यांनी यावेळी केले.